Join us

चेहऱ्याचं सौंदर्य कमी करणारे ब्लॅकहेड्स 'असे’ करा छूमंतर, पार्लरला जाण्याचीही नाही गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:44 IST

Blackheads Home Remedies : त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषूण घेण्यासाठी ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करता येऊ शकतो. चला जाणून घेऊ कसा करावा वापर...

Blackheads Home Remedies : आजकाल त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना महिलांना करावा लागतोय. महिलाही त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. जास्तीत जास्त महिलांना भेडसावणारी एक कॉमन समस्या म्हणजे नाकांवरील ब्लॅकहेड्स. चेहऱ्याचं मनमोहक सौंदर्य कमी करणारे हे ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण त्यातील काहीच फायदेशीर ठरतात. अशात काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरतात. यातीलच एक घरगुती उपाय म्हणजे तांदळाचं पीठ. त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषूण घेण्यासाठी ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करता येऊ शकतो. चला जाणून घेऊ कसा करावा वापर...

तांदळाच्या पीठाचा 'असा' करा वापर!

दही आणि तांदळाचं पीठ

दही आणि तांदळाचं पीठ चांगल्याप्रकारे मिश्रित करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर कमीत कमी अर्ध्या तासांसाठी लावून ठेवा. नंतर हळूहळू हलक्या हाताने स्क्रब करा आणि चेहरा पाण्याचे स्वच्छ करा.

अ‍ॅलोवेरा आणि तांदळाचं पीठ

ताजं अ‍ॅलोवेरा जेल घेऊन त्यात तांदळाचं पीठ मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हळूहळू चेहऱ्यावर स्क्रब करा. याने ब्लॅकहेड्स मुळातून काढण्यासाठी मदत होईल. कमीत कमी १० मिनिटांपर्यंत थांबा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

संत्र्याच्या सालीचं पावडर आणि तांदळाचं पीठ

संत्र्याच्या सालीचं पावडर आणि तांदळाचं पीठ लावल्याने ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यास मदत मिळते. यासाठी संत्र्याच्या सालीचं पावडर, तांदळाचं पीठ, गुलाबजल आणि बेसन घ्या. यांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तशीच चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा चांगल्याप्रकारे स्क्रब करा. काही वेळाने चेहरा धुवा.

साखर आणि तांदळाचं पीठ

तांदळाच्या पिठात मध, साखर आणि बेसन मिश्रित करा. याची पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. जवळपास १० मिनिटांपर्यंत पेस्ट चेहऱ्यावर लावूनच ठेवा. नंतर चेहऱ्यावर हळूहळू स्क्रब करा आणि काही मिनिटांनी चेहरा धुवा.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स