बरेचदा आपण चेहरा आणि इतर त्वचेची काळजी घेताना हाताच्या कोपराकडे दुर्लक्ष केलं जात. यामुळे बहुतेकजणांच्या हाताचे कोपर हे काळेकुट्ट झालेले असते. संपूर्ण हात किंवा इतर त्वचेचा रंग वेगळा आणि हाताच्या कोपराचा रंग वेगळा असा अनुभव बरेचदा अनेकांनी घेतला असेल. आपल्या शरीरावर असे काळे डाग पडलेले शक्यतो कुणालाही आवडणार नाही. कोपरांच्या या काळेपणामुळे काहीवेळा आपल्याला चारचौघात लाजल्यासारखे होते. एवढेच नव्हे तर हाताचे कोपर काळेकुट्ट झाले म्हणून काहीजणी स्लिव्हलेस घालणे देखील सोडून देतात. खास करुन महिला काळेकुट्ट कोपर दिसू नयेत म्हणून पूर्ण झाकलेले कपडे घालतात(How To Prevent & Treat Dark Elbows).
कोपर एकदा का काळेकुट्ट पडले की त्याचा रंग पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागतो. हाताच्या कोपराचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बाजारांत विकत मिळणाऱ्या अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करुन पाहतो. या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे काही काळासाठी हा काळपटपणा दूर होतो, आणि हे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापराचे सोडून दिले की पुन्हा आहे तशीच काळपट स्किन होते. यासाठी हे महागडे केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपण घरच्याघरीच काही नॅचरल पदार्थ वापरून कोपरांचा काळपटपणा कमी करु शकतो. कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय करताना नेमकं काय करायच ते पाहूयात(Home Remedies to Get Rid Of Dark Elbows).
कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी हा उपाय करुन पहा...
साहित्य :-
१. टूथपेस्ट - २ टेबलस्पून
२. लिंबू - अर्ध्या लिंबाचा तुकडा
३. हळद - १ टेबलस्पून
४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...
फक्त १ टेबलस्पून चिया सीड्सचे करा केसांसाठी कंडिशनर- एका धुण्यात केस होतील सिल्की आणि चमकदार...
आता या साहित्याचा वापर कसा करायचा ?
१. सगळ्यात आधी बोटावर थोडीशी टूथपेस्ट घेऊन ती दोन्ही हातांच्या कोपरांवर लावून हलक्या हाताने चोळून मसाज करून घ्या.
२. त्यानंतर एका बाऊलमध्ये हळद घेऊन त्यात एलोवेरा जेल घालून हे दोन्ही जिन्नस मिक्स करुन एकजीव करून घ्यावे.
३. आता एक लिंबू घेऊन तो बरोबर मधोमध कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. यातील अर्धा भाग घेऊन त्यावर हळद आणि एलोवेरा जेलचे एकत्रित मिश्रण लावून घ्यावे.
४. आता टूथपेस्ट लावलेल्या कोपरांवर लिंबू आणि त्यावर लावलेल्या मिश्रणाने कोपरं चोळून घ्यावे.
५. त्यानंतर कोपर स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यावे.
या मास्कचा वापर केल्याने काळपटपणावर कसा उपयोग्य होतो ?
१. हळद :- स्किन आतून स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल तत्व त्वचेच्या सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते. त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
२. लिंबू :- लिंबू त्वचेमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. तसेच त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर असते. जे डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते.
३. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल हे त्वचेवरील सर्व समस्यांसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. हे मॉइस्चरायझिंगसाठी उत्तम मानले जाते. त्वचेवरील काळेपणा कमी करणारे गुणधर्म देखील यात असतात. एवढेच नाही तर ते तुमच्या खराब झालेल्या त्वचेच्या पेशी आणि कोरडेपणाही दूर करते.