Join us  

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा 3 घरगुती उपाय; ओठ होतील मऊमुलायम- गुलाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 8:21 PM

मेलानिन तयार होण्याचं प्रमाण वाढल्यानं चेहेऱ्यावर जसा काळेपणा (dark lips) येतो तसाच ओठांवरही येतो. घरगुती उपायांचा (home remedy for reduce dark lips) वापर करुन ओठांचा काळेपणा सहज घालवता येतो. 

ठळक मुद्देकोरफड, खसखस, बीट, गाजर, बेकिंग सोडा आणि गुलाब पाण्याचा वापर करुन ओठांचा काळेपणा दूर करता येतो. 

वय वाढत जातं तसा त्वचेमध्येही बदल होतो. मेलानिन तयार होण्याचं प्रमाण वाढल्यानं चेहेऱ्यावर जसा काळेपणा येतो तसाच ओठांवरही येतो. विशेषत: घाम जास्त येत असल्यास त्वचा आणि ओठ काळे (dark lips)  होण्याचं प्रमाण वाढतं. चेहेऱ्यावरचा काळेपणा कमी करणं तसं सोपं काम आहे पण ओठांवरचा काळेपणा कमी करणं तसं अवघड आणि नाजूक काम. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ पुनम चुग यांनी घरच्याघरी करता येतील असे सोपे उपाय सांगितले आहेत. पुनम चुग यांनी ओठांच्या नाजूकपणाचा विचार करुन  ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी (home remedy for reduce dark lips)  कोरफड, खसखस, बीट, गाजर, बेकिंग सोडा आणि गुलाब पाण्याचा वापर करण्यास सांगितलं आहे.

कोरफड आणि खसखस स्क्रब

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी कोरफड आणि खसखस स्क्रब करण्यासाठी 1 छोटा चमचा कोरफड गर/ कोरफड जेल आणि 1 छोटा चमचा खसखस घ्यावी. एका छोट्या वाटीत कोरफड गर आणि खसखस एकत्र करावं. या मिश्रणानं ओठांवर दोन मिनिटं स्क्रब करावं. नंतर ओठ पाण्यानं स्वच्छ धुवावेत. ओठ रुमालानं टिपून घेतल्यावर ओठांना पेट्रोलियम जेली लावावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास काही दिवसातच ओठांचा काळेपणा निघून जातो.  कोरफडच्या गरात क जीवनसत्व असतं. क जीवनसत्वामुळे त्वचा ब्लीच होते. त्यामुळेच ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी कोरफड गराचा उपयोग होतो. 

Image: Google

बीट आणि गाजराचा रस

बीट आणि गाजराच्या रसाचा उपयोग करुन ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी 1 छोटा चमचा बीटाचा आणि गाजराचा रस आणि 1 छोटटाचमचा विटॅमिन ई कॅप्सूल घ्यावी. एका छोट्या वाटीत बीट आणि गाजराचा रस काढून घ्यावा. त्यात विटॅमिन ई कॅप्सूल पंक्चर करुन घालावी. हे मिश्रण एकजीव करुन घ्यावं. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावावं. हा उपाय नियमित केल्यास ओठ मऊ मुलायम तर होतातच शिवाय ओठांची लालीही वाढते. 

Image: Google

बेकिंग सोडा आणि गुलाब पाणी

अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 छोटा चमचा गुलाब पाणी घ्यावं. दोन्ही गोष्टी एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण ओठांना लावून हलक्या हातानं मसाज करावा.  दोन मिनिटं मसाज केल्यानंतर ओठ पाण्यानं स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून किमान दोन वेळा हा उपाय केल्यास ओठांवर त्याचे चांगले परिणाम दिसतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीओठांची काळजी