Join us  

काखेतला काळेपणा कमी करण्यासाठी हळदीचा करा ‘असा’ सोपा उपाय, वेदनादायी व्हॅक्सिंगचे परिणाम विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 6:03 PM

Home remedies to get rid of dark underarms : काखेतला काळेपणा प्रचंड वाढला आहे? २ घरगुती उपायांनी होईल त्रास कम

गडद अंडरआर्म्समुळे काही महिलावर्ग स्लिव्जलेस घालणं टाळतात (Dark UnderArms). स्लिव्जलेस कपडे घातल्याने आपण हाताची हालचाल करण्यास टाळतो. अंडरआर्म्स गडद होण्यामागे अनेक कारणं असू शकतात (Beauty). उदाहरणार्थ, हार्मोनल बदल, ब्लेडने शेव्हिंग करणे आणि जास्त धूम्रपान केल्यामुळे अंडरआर्म्सची त्वचा काळपट पडू शकते (Skin Care Tips).

काळेपणामुळे कधी कधी काखेतून दुर्गंधीही येऊ लागते. शिवाय आपल्याला चारचौघात लाजिरवाणेही वाटते. काळेपणा घालवण्यासाठी आपण केमिकल उत्पादनांचा वापर करतो. यामुळेही काखेतला काळेपणा अधिक गडद होत जातो. जर केमिकल उत्पादनांचा वापर करूनही काखेतला काळेपणा निघत नसेल तर, घरगुती उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे काखेतला टॅनिंग निघून जाईल(Home remedies to get rid of dark underarms).

ब्रेकअप झालं आणि तुमचा देवदास झाला? ३ गोष्टी करा, पडा स्वत:च्या प्रेमात-जगा आनंदात

लिंबू आणि साखरेचा स्क्रब

लिंबू आणि साखरेच्या वापरामुळे काखेतला काळेपणा निघू शकते. यासाठी एका बाऊलमध्ये चमचाभर साखरेत लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार पेस्ट काखेत लावून स्क्रब करा, आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आपण या उपायाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे अंडरआर्म्सची त्वचा साफ होईल.

हळद आणि मसूर डाळ स्क्रब

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण हळद आणि मसूर डाळ यापासून तयार स्क्रबचा वापर करून पाहू शकता. स्क्रबिंगमुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेवर साचलेली घाण निघून जाते. हा स्क्रब तयार करण्यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवा.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

नंतर त्यात एक चमचा हळद आणि २ चमचे लाल मसूर घालून भाजून घ्या. दोन्ही काळपट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात ३ चमचे साखर, मुलतानी माती, बेसन आणि ४ चमचे खोबरेल तेल घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट काखेत लावून स्क्रब करा. थोड्या वेळाने अंडरआर्म्स पाण्याने स्वच्छ करा. या उपायामुळे काही दिवसात टॅनिंग गायब होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी