केस गळण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. याला आपला अपूरा आहार हे जसे कारण आहे, तशीच आणखी इतरही कारणे आहेत. केसांना पुरेसं पोषण मिळालं नाही किंवा आपल्याकडून त्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, तर केसांची वाढ खुंटते, केस गळू लागतात (How to stop hair loss). त्याचबरोबर केस कमी वयात पांढरे होऊ लागणे, केसांमध्ये खूप जास्त कोंडा होणे, अशा समस्याही वाढतात (1 simple solution for long and strong hair ). तुम्हालाही केसांच्या या समस्या असतील आणि सगळ्यात मुख्य म्हणजे केसांची वाढ खूप कमी असेल आणि त्यामानाने केस गळण्याचं प्रमाण मात्र खूप जास्त असेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा...(Home remedies to grow hair faster naturally)
केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय
केसांची वाढ होत नसेल किंवा केस खूप गळत असतील तर कोणता उपाय करावा, याविषयीची माहिती diybeautycoach या पेजवर शेअर करण्यात आली आहे. तुम्ही कोणताही शाम्पू वापरत असाल तरी चालेल, फक्त तो शाम्पू वापरण्याची पद्धत बदला, असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.
स्वयंपाक घरातला सौंदर्याचा खजिना- बघा 'या' ६ पदार्थांची कमाल, फेशियल- क्लिनअपची गरजच नाही
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ ग्लास पाणी, १ चमचा चहा पावडर आणि १ चमचा मेथी दाणे असं साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये चहा पावडर आणि मेथी दाणे टाका. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे चांगलं उकळून घ्या.
भरपूर भाज्या घालून केलेली मिक्स व्हेज करंजी, खमंग- खुसखुशीत, सगळेच आवडीने खातील- घ्या रेसिपी
यानंतर गाळून घ्या आणि थंड झाल्यावर या मिश्रणात तुम्ही नेहमी जो शाम्पू वापरता तो घाला. हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास महिनाभरातच केस गळण्याचं प्रमाण कमी होऊन केसांची भराभर वाढ होईल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.