Lokmat Sakhi >Beauty > अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

4 HOME REMEDIES FOR DARK UNDERARMS : काखेतला वाढता काळेपणा, खूप घाम येणं हा त्रास असेल तर घरगुती नैसर्गिक उपायांचा एकदा नक्की वापर करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 07:26 PM2023-10-30T19:26:41+5:302023-10-30T19:42:21+5:30

4 HOME REMEDIES FOR DARK UNDERARMS : काखेतला वाढता काळेपणा, खूप घाम येणं हा त्रास असेल तर घरगुती नैसर्गिक उपायांचा एकदा नक्की वापर करा...

Home remedies to lighten dark underarms, 4 Easy Remedies to Get Rid of Dark Underarms | अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

आपण बऱ्याचदा बघतो की आपल्या अंडरआर्म्सच्या खाली काळपटपणा येतो. तसेच त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर तो काळपटपणा वाढत जातो. खूप स्त्रियांना स्लीवलेस टॉप, टी - शर्ट घालायचे असतात पण अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे ते स्लीवलेस कपडे घालू शकत नाही. बऱ्याच जणांना वाटते की आपणही इतरांसारखे मनमोकळे कपडे घालावे पण अंडरआर्म्सच्या दिसणाऱ्या काळेपणामुळे (How to Lighten Your Underarms) आपण फॅशनेबल कपडे घालणे कित्येकदा टाळतो(Home remedies to lighten dark underarms).

अंडरआर्म्स मधील हा काळेपणा (Home Remedies Reduce Dark Underarms) कायमचा दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्सयुक्त जेल, पावडर, क्रिम्स  वापरून बघतो, तरी हा काळपटपणा जातच नाही. तसेच वयानुसार जसजसे वय वाढत जाते तसतसा हा काळपटपणा वाढत जातो. म्हणून जर आपण वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिले तर अंडरआर्म्स मधील हा काळपटपणा (4 Easy Remedies to Get Rid of Dark Underarms) कायमचा दूर करता येऊ शकतो. अंडरआर्म्स मधील या काळपटपणा बद्दल जरी कोणी बोलत नसलं तरी ही गोष्ट सर्वांना त्रासाची ठरते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही महिला महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. काखेतील त्वचा संवेदनशील असल्यामुळे केमिकल प्रोडक्ट्स त्वचेवर थेट परिणाम करतात. अशावेळी काखेतील काळपटपणा (These 4 home remedies are best to get rid of dark underarms) आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण होते. जर आपल्याला काखेतील काळवंडलेली त्वचा स्वच्छ करायची असेल तर, काही घरगुती उपायांना फॉलो करून पाहा. यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नसून, घरगुती कमी साहित्यात काखेतील काळपटपणा निघून जाईल(4 Easy Remedies to Get Rid of Dark Underarms).

अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी काही घरगुती टिप्स... 

१. हळद व लिंबाच्या रसाची पेस्ट :- एका बाऊलमध्ये हळद घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. ही तयार पेस्ट अंडरआर्म्स मधील काळ्या पडलेल्या भागांवर लावून अलगद हाताने मसाज करा. त्यानंतर ही पेस्ट ३० मिनीटांसाठी तशीच अंडरआर्म्समधील भागांवर लावून ठेवावी. त्यानंतर पाण्याने ही पेस्ट स्वच्छ धुवून घ्यावी. हळद आणि लिंबू दोन्ही त्वचा उजळण्यास मदत करतात. घामामुळे अंडरआर्म्समध्ये साचलेली घाण आणि दुर्गंधी देखील काढून टाकण्यास मदत करतात. लिंबू आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. हे केवळ अंडरआर्म्सची काळवंडलेली त्वचा स्वच्छ करत नसून, डेड स्किन देखील काढून टाकण्यास मदत करते. यासाठी आंघोळीपूर्वी, लिंबाचा रस काखेत लावून चोळा. एक ते दोन मिनिटे लिंबू काखेत चोळल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा.

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

२. बटाट्याचा रस :- कच्चा बटाटा हे एक नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. आपण कच्चा बटाटा कापून काखेत फिरवू शकता. यामुळे काखेतील घाण साफ होईल. यासाठी बटाट्याचा रस काढून कापसाच्या गोळ्याच्या मदतीने काखेत लावा. नियमित ही टीप फॉलो केल्याने काही दिवसात फरक दिसेल. बटाट्यामध्ये त्वचा उजळण्याचे गुणधर्म देखील असतात. ज्याचा वापर करून अंडरआर्म्सच्या काळ्या रंगापासून सुटका मिळू शकते. 

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

३. एलोवेरा जेल :- चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करतो. यासोबतच काही लोकं केसांसाठी देखील एलोवेरा जेलचा वापर करतात. आपण याचा वापर अंडरआर्म्ससाठीही करू शकतो. हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते, याच्या वापराने मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. याच्या नियमित वापराने अंडरआर्म्सचे काळे डाग सहज दूर होतील.

पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

४. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा हा आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असतो. तसेच बेकिंग सोड्यामध्ये मॅग्नेशियम व ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात. जे आपल्या त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यासाठी एका बाऊलमध्ये थोडासा बेकिंग सोडा घ्यावा. त्यामध्ये पाणी मिसळून ते मिश्रण अंडरआर्म्सला लावावे. दहा मिनिटानंतर अंडरआर्म्स स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. हा उपाय काही दिवस केल्याने अंडरआर्म्सच्या काळपटपणाची समस्या दूर होऊ शकते.

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

अंडरआर्म्स काळे न होण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात... 

१. आपल्या अंडरआर्म्सला कोणत्याही प्रकारचे केमिकल्सयुक्त प्रॉडक्टस लावू नयेत.
२. अंडरआर्म्सच्या काळपटपणाचे मुख्य कारण म्हणजे दिवसभर येणारा घाम. जर आपल्याला खूप घाम येत असेल तर आपण दिवसातून दोन वेळा आंघोळ  करावी. तसेच आंघोळीला थोडेसे कोमट पाणी घेतले तरी चालेल.
३. नेहमी स्वच्छ कपडे घालावे. आपण बरेचदा याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून त्यानंतर आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागते याकडे दुर्लक्ष करू नये.
४. जास्त केमिकल्स असणाऱ्या परफ्युम, डिओड्रंट्सचा वापर करणे टाळावे.

Web Title: Home remedies to lighten dark underarms, 4 Easy Remedies to Get Rid of Dark Underarms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.