Lokmat Sakhi >Beauty > हात गोरे पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? १ सोपा उपाय, टॅनिंग निघेल- ग्लोईंग, सुंदर दिसेल हात

हात गोरे पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? १ सोपा उपाय, टॅनिंग निघेल- ग्लोईंग, सुंदर दिसेल हात

Home Remedies to Lighten Dark Underarms : वारंवार रेजरचा वापर केल्यामुळे स्किन टॅनिंग वाढत जातं.  स्किन लाईटनिंगने काळपटपणा दूर करण्यासाठी बराच खर्च येतो. यापेक्षा सोपे घरगुती उपाय १ ते २ आठवडे नियमित केले तर त्वचा उजळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 12:17 PM2023-09-01T12:17:59+5:302023-09-01T12:38:28+5:30

Home Remedies to Lighten Dark Underarms : वारंवार रेजरचा वापर केल्यामुळे स्किन टॅनिंग वाढत जातं.  स्किन लाईटनिंगने काळपटपणा दूर करण्यासाठी बराच खर्च येतो. यापेक्षा सोपे घरगुती उपाय १ ते २ आठवडे नियमित केले तर त्वचा उजळेल.

Home Remedies to Lighten Dark Underarms : How to Lighten Underarms Natural Remedies And Skin Care Tips | हात गोरे पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? १ सोपा उपाय, टॅनिंग निघेल- ग्लोईंग, सुंदर दिसेल हात

हात गोरे पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? १ सोपा उपाय, टॅनिंग निघेल- ग्लोईंग, सुंदर दिसेल हात

स्लिव्हलेस ड्रेस, टॉप घालण्याची इच्छा बऱ्याच महिलांची असते. पण काहीजण आर्म फॅटमुळे तर काहीजणी काखेतील काळेपणामुळे स्लिव्हजलेस ड्रेस घालणं टाळतात. (Dark Under Arms)  काळे अंडरआर्म्स दिसण्याच्या भितीने अनेकजणी  स्लिव्हजलेस ड्रेस घालत नाहीत. बऱ्याचजणी रेजरचा वापर करून काखेतले केस काढतात.  वारंवार रेजरचा वापर केल्यामुळे स्किन टॅनिंग वाढत जातं.  स्किन लाईटनिंगने काळपटपणा दूर करण्यासाठी बराच खर्च येतो. यापेक्षा तुम्ही सोपे घरगुती उपाय १ ते २ आठवडे नियमित केले तर त्वचा उजळेल. (How to Lighten Underarms Natural Remedies And Skin Care Tips)

अंडरआर्म्सचा काळपटपणा कसा घालवावा?

अंडरआर्म्सचा काळेपणा काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटीत २ ते ३ चमचे हळद  घाला. हळदीत २ चमचे कॉफी घाला.  त्यात कोलगेट आणि एलोवेरा जेल घाला. त्यात रोज वॉटर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.  ही पेस्ट अंडरआर्म्सच्या काळपट त्वचेवर लावा. नंतर हात स्वच्छ कापडानं किंवा टिश्यू पेपरनं पुसून घ्या. या सोप्या उपायानं अंडरआर्म्सचा काळेपण दूर होईल आणि त्वचा चमकदार दिसेल. (How To Treat & Prevent Dark Underarms)

१) लिंबू एक नॅच्युरल ब्लिचिंग एजेंट आहे. अंघोळीच्या  १ ते २ मिनिटं आधी डार्क भागांवर लिंबू लावा लिंबामुळे  त्वचा रंग फेअर  होण्यास मदत होईल. काही दिवसातच त्वचेत फरक दिसून येईल.

२) त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. एक चमचा ब्राऊन शुगरबरोबर एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. १ ते २ मिनिटं स्क्रब करा. काही वेळ तसेच राहू द्या, त्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवा.

३) नारळाचं तेल त्वचेसाठी तसंच केसांसाठी गुणकारी ठरतं. यात नॅच्युरल स्किन लाईटनिंग एजेंट व्हिटामीन ई असते. नारळाच्या तेलाने रोज अंडरआर्म्सची मालिश करा आणि १५ मिनिटांनी तसंच सोडून मग पाण्याने स्वच्छ धुवा. 

४) बेकींग सोडा अंडरआर्म्सचा रंग उजळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बेकींग सोडा पाण्यात मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून २ वेळा अंडरआर्म्सवर लावा आणि १० मिनिटांनी धुवून टाका.

५) एप्पल सायडर व्हिनेगर फक्त फॅट कमी करत नाही तर यामुळे त्वचेवरचे डेड सेल्स कमी होतात. कारण यात माईल्ड एसिड असतात  ज्यात नॅच्युरल  क्लिनर्स असतात. बेकींग सोडा आणि व्हिनेगर मिसळून अंडरआर्म्सवर लावा. थोडावेळ सुकण्यासाठी तसंच ठेवा नंतर स्वच्छ धुवून टाका.

Web Title: Home Remedies to Lighten Dark Underarms : How to Lighten Underarms Natural Remedies And Skin Care Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.