Join us  

ओपन पोर्समुळे चेहरा सतत डल, काळपट दिसतो ? ओपन पोर्स नैसर्गिकरित्या बंद करण्याचे ४ सोपे घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 7:14 PM

Natural Home Remedies for Open Pores : चेहऱ्यावरच्या ओपन पोर्सच्या समस्येने हैराण ? वापरून पहा या ४ खास घरगुती पदार्थांची जादू....

त्वचा म्हटली की त्याचा संबंधित अनेक समस्या सगळ्यांनाचं असतात. काही समस्या या लहान असतात तर काही समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या गंभीर समस्या होऊन बसतात. कोरडी, निस्तेज त्वचा, त्वचेवर सतत मुरुम, पुटकुळ्या येणे, त्वचेचा पोत बिघडणे, त्वचा ऑयली होणे, लालसर पडणे अशा अनेक समस्या त्वचेसंदर्भात असतात. यापैकीच ओपन पोर्स (Open Pores Treatment at Home) ही समस्या आपल्यापैकी अनेकजणींना सतावते. यासोबतच काहीवेळा वयानुसार चेहऱ्यावर हे ओपन पोर्स अधिक दिसू लागतात. ओपन पोर्स (Natural Home Remedies for Open Pores) हे विशेषतः नाक, कपाळ, डोळ्यांखाली, गालांवर किंवा हनुवटीवर दिसतात. या चेहऱ्यावरील ओपन पोर्सवर जर आपण मेकअप किंवा कोणतेही ब्यूटी प्रॉडक्ट्स लावले तर त्वचेचे आणखी जास्त नुकसान होऊ शकते(How can I close my open pores naturally?).

त्वचेवर ओपन पोर्स असल्यामुळे त्यात धूळ, माती, धूलिकण जाऊन अडकतात. ज्यामुळे हे ओपन पोर्स संपूर्णपणे ब्लॉक होऊन जातात, यामुळे त्वचा अधिक खराब दिसू लागते. ही ओपन पोर्सची (Home Remedies To Get Rid Of Open Pores On Skin) समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. परंतु काहीवेळा याचा काहीच फायदा होत नाही अशावेळी आपण काही घरगुती नैसर्गिक उपायांचा (How To Close Open Pores on Face) वापर करुन हे ओपन पोर्स बंद करु शकतो. इंस्‍टाग्रामवर त्वचा विशेषतज्ज्ञ, कृतिका मोहन हिने व्हिडिओ शेअर करत ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत(How to close open pores on face permanently). 

ओपन पोर्स घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय कोणते ? 

१. मुलतानी माती :- दोन चमचे मुलतानी माती आणि थोडे पाणी किंवा गुलाबपाणी घेऊन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी होईपर्यंत चेहऱ्यावर राहू द्या. हा फेसपॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. मुलतानी माती फक्त पिंपल्सच कमी करत नाही तर ओपन पोर्स कमी करण्यास देखील मदत करते त्याचबरोबर ओपन पोर्समधील अतिरिक्त तेल व घाण देखील साफ करते. मुलतानी माती लावल्याने चेहरा एक्सफोलिएट होतो. मुलतानी मातीच्या वापराने लूज पडलेले ओपन पोर्स घट्ट करण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर चमक आणते. हा फेसपॅक लावल्याने त्वचेवरील डाग दूर होण्यासही मदत होते.

घरच्याघरी १००% शुद्ध कोरफड जेल बनवायची सोपी कृती, ३ स्टेप्स - महागड्या जेलची गरजच नाही...

२. दही :- दह्याचा वापर करून देखील आपण त्वचेवरील ओपन पोर्स सहजपणे बंद करु शकतो. दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिडचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. दह्याच्या वापराने त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत मिळते. दुसरे म्हणजे, दह्यामध्ये अनेक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे तुमचे ओपन पोर्स बंद करतात आणि मुरुमांना कारणीभूत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जीवाणूंची त्वचेवर वाढ होऊ देत नाहीत. दह्याने त्वचेला मसाज केल्यास त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि तिची लवचिकता वाढते.

३. मध :- तेलकट त्वचेसाठी मध हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे . आपण मुलतानी माती, मध, गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवू शकता. हा फेसपॅक मुरुम आणि ओपन पोर्सची समस्या कमी करण्यास मदत करतो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, हायड्रोजन पेरॉक्साइड जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेवर वाढणारे वाईट बॅक्टेरिया नाहीसे होतात.   

४. बर्फ :- बर्फाचे तुकडे आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. चेहरा स्वच्छ केल्यानंतर बर्फाचे तुकडे स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि काही सेकंदांसाठी ओपन पोर्सवर फिरवा. बर्फामुळे ब्लॉक झालेले ओपन पोर्स अनलॉक होण्यास मदत होते.

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा :-

१. वरीलपैकी कोणताही एक उपाय किंवा फेसमास्क आठवड्यातून एकदा किंवा रात्री झोपताना वापरावा. 

२. फेसमास्क धुताना नेहमी तो थंड पाण्याने धुवा. 

३. फेसमास्क चेहऱ्याला लावून झाल्यानंतर चेहरा संपूर्ण कोरडा करुन चेहऱ्यावर मॉइश्चराझरचा जाड थर लावून घ्यावा. 

४. दुसऱ्या दिवशी सकाळी सनस्क्रीन लावून मगच घराबाहेर पडा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी