Join us  

कपाळावर काळेपणा - मुरुमांचे डाग निघतच नाहीत? दुधात १ गोष्ट कालवून लावा; त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 1:53 PM

Home Remedies To Remove Dark Spots on the Face and Forehead : कपाळावरचा काळेपणा घालवण्यासाठी ३ जबरदस्त उपाय

प्रत्येकाला आपली त्वचा डागरहित (Beauty Tips) आणि चमकदार असावी असे वाटते (Skin care Tips). परंतु काही वेळा शरीरातील हार्मोनल बदल, जास्त सूर्यप्रकाश आणि मेलेनिनचे प्रमाण वाढल्यामुळे कपाळावर काळेपणा येतो. त्यामुळे कपाळाची त्वचा चेहऱ्यापेक्षा वेगळी दिसू लागते, जी चांगली दिसत नाही. अशा स्थितीत आपण विविध उपाय करून पाहतो. शिवाय महागड्या ब्यूटी उत्पादनांचाही वापर करून पाहतो. पण यामुळे कपाळाचा काळेपणा दूर होईलच असे नाही.

जर आपल्याला कपाळाचा काळेपणा ब्यूटी उत्पादनांमध्ये खर्च न करता, घरच्या साहित्यांमध्ये घालवायचा असेल तर, काही घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा. यामुळे काही दिवसात फरक दिसेल. शिवाय कपाळावरील काळेपणा, मुरुमांचे डागही गायब होतील(Home Remedies To Remove Dark Spots on the Face and Forehead).

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

कपाळाचा काळेपणा आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी उपाय

- कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी कच्चे दूध हा सर्वात प्रभावी उपाय आहे. यामुळे कपाळ तर स्वच्छ होईलच पण सुरकुत्या आणि बारीक रेषाही कमी होतील.

- यासाठी एका भांड्यात दूध घ्या. त्यात गुलाबजल मिसळा. चेहऱ्याला ५ मिनिटे मसाज करा, आणि चेहरा पाण्याने धुवा. महिनाभर हा उपाय करून पाहा. काही दिवसात आपल्याला फरक दिसेल.

- दुसरा उपाय म्हणजे बदाम तेल. बदामच्या तेलामुळे कपाळाचा काळेपणा दूर होईल. यासह त्वचेला चमक आणि घट्टपणाही येईल. बदामाच्या तेलामध्ये असलेले झिंक सेबमचे उत्पादन नियंत्रित करते. त्यामुळे मुरुमांचे प्रमाण कमी होते. यासाठी एका बाऊलमध्ये बदामाचे तेल, दुधाची पावडर आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावा. काही वेळ तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवा.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

- काकडीच्या पेस्टमुळे कपाळावरील काळेपणा दूर होईल. यासाठी फक्त काकडीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. १० मिनिटे तसेच ठेवा. १० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा, आणि नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. यामुळे चेहरा क्लिन येईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी