Join us  

केस खूपच पातळ झालेत? नियमितपणे करा पृथ्वी मुद्रा, केस गळणं होईल कमी, बघा कशी करायची ही मुद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2022 6:33 PM

Yoga For Reducing Hair Fall: केस खूप गळत असतील तर त्यावर काही केमिकलयुक्त उपाय करण्यापेक्षा हे सोपे, नैसर्गिक उपाय (natural remedies) करून बघा. चांगला  परिणाम दिसून येईल.

ठळक मुद्देहा उपाय नियमितपणे केल्यास २ महिन्यांत केस गळती कमी झाल्याचे जाणवेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.  

केस गळणे ही अनेकींसमोरची मोठी समस्या आहे. काहीही करा, कोणतेही शाम्पू वापरून बघा, तरीही केसांचं गळणं (hair fall) काही  कमी होतच नाही, असं अनेकींचं म्हणणं असतं. केस त्यांच्या मुळाशी नाजूक झालेले असतात. त्यामुळे ते गळतात. अशा नाजूक  केसांवर जर तुम्ही शाम्पू किंवा अन्य कोणत्या माध्यमातून केमिकल्सचा मारा केला तर त्यामुळे केसांचं जास्त नुकसान होतं.  त्यामुळे केस गळण्याच्या समस्येवर हा एक सोपा उपाय करून बघा. हा उपाय (Prithvi Mudra For Reducing Hair Fall) इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

केसांचं गळणं थांबविण्यासाठी पृथ्वीमुद्रा१. योगशास्त्रात अशा अनेक मुद्रा सांगितल्या आहेत. या मुद्रांमुळे तळहातावरचे जे प्रेशर पॉईंट्स असतात, त्यांच्यावर दाब निर्माण होतो आणि त्यांचा उपयोग तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी होतो.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

२. यापैकीच एक मुद्रा म्हणजे पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा केल्यामुळे केस गळणं तर कमी होतंच पण त्यासोबतच इतरही अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात. 

३. ही मुद्रा करण्यासाठी तळहात सरळ करा. त्यानंतर अंगठा आणि मरंगळी म्हणजेच करंगळीच्या बाजूचे बोट यांची टोके म्हणजेच पुढचा भाग एकमेकांवर ठेवा आणि हलकासा दाब द्या. दोन्ही तळहातांनी अशाच पद्धतीने मुद्रा करा.

४. मांडी घालून ताठ बसा आणि १० मिनिटांसाठी दोन्ही हात याच मुद्रेत ठेवा.

५. हा उपाय नियमितपणे केल्यास २ महिन्यांत केस गळती कमी झाल्याचे जाणवेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.  

 

यासोबतच हे उपायही करा१. दररोज रिकाम्या पोटी १५ मिनिटांसाठी हाताची नखे एकमेकांवर घासा.

२. रिकाम्या पोटी कढीपत्त्याची ५ पाने चावून चावून खा.

हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी घरीही करता येईल, ते ही झटपट! बघा, रुमाली रोटी करण्याची सोपी रेसिपी

३. कच्चा आवळा खाण्याचं प्रमाण वाढवा.

४. दिवसांतून २ वेळा केस विंचरा.

५. आठवड्यातून एकदा डोक्याला मसाज करा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीयोगासने प्रकार व फायदेहोम रेमेडी