Join us  

डार्क सर्कल घालवण्याचा १ सोपा घरगुती उपाय; मिळेल झटपट आराम, दिसाल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2023 5:29 PM

Home Remedy For Dark Circle And Hyper-pigmentation : डार्क सर्कल आणि काळ्या डागांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते.

डार्क सर्कल आणि चेहऱ्यावरचे डाग ही बहुतांश तरुणींची आणि महिलांची अतिशय सामान्य समस्या असते. सौंदर्य म्हणजे चेहरा असं पक्क समीकरण अनेकींच्या डोक्यात असते. त्यामुळे चेहरा छान दिसला की आपण सुंदर दिसतो असं आपल्याला वाटते. हे काही प्रमाणात जरी खरे असले तरी आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य हेही उत्तम असणे तितकेच गरजेचे असते. कामाचा ताण, आहाराच्या पद्धती, अपुरी झोप, प्रदूषण, पचनाच्या तक्रारी यांमुळे त्वचेच्या काही ना काही तक्रारी उद्भवतातच (Home Remedy For Dark Circle And Hyper-pigmentation). 

कधी चेहरा खूप कोरडा पडतो, कधी चेहऱ्यावर खूप फोड येतात, कधी सुरकुत्या पडल्याने कमी वयात आपण वयस्कर दिसायला लागतो तर कधी डार्क सर्कल आणि काळ्या डागांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. पण या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केला जाणारा हा उपाय डार्क सर्कलसाठी अतिशय फायदेशीर असून तो कसा करायचा ते पाहूया...

१. एक बटाटा घ्यायचा आणि त्याची सालं काढून घ्यायची. 

२. या बटाट्याच्या फोडी करुन त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करुन घ्यायची. 

३. यामध्ये २ चमचे कोरफडीचा गर आणि व्हिटॅमिन इ कॅप्सुल घालायची. 

४. हे मिश्रण एका हवाबंद डबीत भरुन फ्रिजमध्ये ठेवायचे. साधारण ७ दिवसांपर्यंत हे फ्रिजमध्ये चांगले टिकते. 

५.  गरज असेल तेव्हा ही डबी काढून डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर काळे डाग पडलेल्या ठिकाणी आपण हे मिश्रण लावू शकतो. 

६. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनीटे ठेवायचे आणि मग पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा. 

७. अतिशय सोपा आणि सहज करता येण्याजोगा उपाय असल्याने एक दिवसाआड तुम्हा हा उपाय नक्की करु शकता. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी