सतत स्क्रीन समोर पाहून काम करणं, मोबाईलचा तासनतास वापर यामुळे प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आजकाल डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल्समुळे संपूर्ण चेहरा काळपट दिसायला लागतो. (Skin Care Tips) काहीजणांचे डार्क सर्कल्स इतके डार्क आणि खोल दिसतात की असे लोक वयाआधीच म्हातारे दिसतात म्हणजेच चेहरा वयस्कर वाटतो. (Home remedy for dark circles)
डार्क सर्कल्सपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. ब्लिच फेशियल केल्यानंतरही फक्त काहीवेळा चेहरा चांगला दिसतो पण डार्क सर्कल्स कायमचे जात नाहीत. (How to remove dark circles) डार्क सर्कल्स काढून टाकण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो. आपल्या प्रत्येकाच्याच घरी बटाटा असतो. बटाट वापरून तुम्ही कमीत कमी वेळात चेहऱ्यात फरक पाहू शकता.
- डार्क सर्कल्स घालवण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी सगळ्यात आधी एक बटाटा स्वच्छ धुवून किसून घ्या. बटाट्याचा रस व्यवस्थित काढून घ्या. त्यात १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा एलोवेरा जेल, १ चमचा बदामाचं तेल घाला. हे मिश्रण एकत्र करून डोळ्यांच्या खाली लावा. रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवून टाका.
केस खूप पिकलेत, डाय नको वाटतो? या ट्रिकनं घरगुती डाय लावा; कायम केस राहतील काळेभोर
- त्वचेसाठी दूधही खूप फायदेशीर आहे. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी थंड दूध वापरा. यासाठी एका भांड्यात कापसाचे गोळे दुधात भिजवा. डोळ्यांची काळी वर्तुळे कापसाने झाकल्यानंतर. सुमारे 20 मिनिटे डोळ्यांवर कापूस ठेवा. नंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. जर तुम्ही ही क्रिया नियमितपणे सकाळी आणि रात्री केली तर तुम्हाला परिणाम दिसेल.
- गुलाबपाणी देखील तुमच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे, म्हणून थंड दुधात समान प्रमाणात गुलाबपाणी मिसळा आणि कापूस भिजवा. मग ते तुमच्या डोळ्यांवर ठेवा. सुमारे 20 मिनिटांनंतर, कापूस काढून टाका आणि ताज्या पाण्याने चेहरा धुवा. जर तुम्ही असे रोज केले तर आठवडाभरात तुमच्या चेहऱ्यावरची काळी वर्तुळे नाहिशी होतील.