Join us  

थंडीमुळे त्वचा खूप कोरडी पडते? १ सोपा उपाय, मॉईश्चरायजर न लावताही त्वचा राहील कोमल, मुलायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2023 3:04 PM

Home Remedy For Dry Skin : डॉ. भारती तनेजा घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय सांगतात.

थंडीच्या दिवसांत शरीराला पाण्याची आवश्यकता असते मात्र गारठ्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. इतकेच नाही तर हवा कोरडी असल्याने शरीरातील आर्द्रता कमी होते आणि शरीर कोरडे पडते. या कोरडेपणामुळेच थंडीच्या दिवसांत त्वचेच्या समस्या निर्माण होतात. कधी कधी त्वचा इतकी कोरडी पडते की त्वचेला खाज सुटते आणि कोंडा निघतो. अशावेळी आपण साधारणपणे त्वचेला तेल लावणे किंवा मॉईश्चरायजर लावणे असे उपाय करतो. पण या उपायांचाही म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. कारण याचा इफेक्ट काही काळ राहतो आणि पुन्हा त्वचा कोरडी व्हायला लागते. ब्युटी एक्सपर्ट असलेल्या डॉ. भारती तनेजा घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय सांगतात. ज्यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून आपले संरक्षण होऊ शकते (Home Remedy For Dry Skin). 

फेस मास्क तयार करण्याची सोपी पद्धत

१. एक बाऊल घेऊन त्यामध्ये १ चमचा कोरफडीच्या गर घ्यायचा. त्यात २ चमचे तुळशीचा रस एकत्र करायचा.

(Image : Google)

२. या मिश्रणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून हे मिश्रण एकजीव करायचे.

३. हा पॅक चेहऱ्यावर एकसारखा लावायचा आणि १५ ते २० मिनीटांसाठी चेहरा तसाच ठेवायचा. 

४. गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आणि मग नॅपकीनने कोरडा करुन मॉईश्चरायजर लावायचे. 

५. घरच्या घरी करता येणारा हा सोपा उपाय आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा नक्कीच करु शकतो. यामुळे केवळ चेहऱ्याला मॉईश्चरायजिंग इफेक्ट मिळेल असे नाही तर चेहऱ्यावर एकप्रकारचा ग्लो येण्यासही मदत होईल. 

तुळशीचे फायदे 

१. आयुर्वेदीक महत्त्व असलेल्या तुळशीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असे दोन घटक असतात. तसेच तुळशीमध्ये बीटा केरोटीनही असते, ज्यामुळे त्वचेला विशेष फायदा होतो.  

(Image : Google)

२. तुळशीमध्ये हिलिंग करण्याचा गुणधर्म असल्याने आपल्या चेहऱ्याची त्वचा जास्त खराब झाली असेल तर तिचा पोत सुधारण्यास या उपायाचा चांगला फायदा होतो. 

३. तुळस नैसर्गिक ब्लड प्युरीफायर असल्याने ती चेहऱ्याला लावून आणि खाल्ल्याने फायदे होतातच. त्वचेत कोणत्या प्रकारच्या अशुद्धी असतील तर त्या दूर होण्यास तुळस फायदेशीर ठरते तसेच मुरुमांसारखे त्रास दूर होण्यासही त्याची मदत होते. 

४. तुळशीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. त्वचेला कोणता संसर्ग झाला असेल तर तो कमी करण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी