Join us  

चेहऱ्यावरच्या अनावश्यक केसांमुळे सौंदर्यात बाधा येते? १ सोपा उपाय, चेहरा दिसेल नितळ-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 11:39 AM

Home Remedy For Facial Hair Growth : पाहूया यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा कसा वापर करायचा.

ठळक मुद्देकोणताही उपाय करण्याआधी हातावर पॅच टेस्ट अवश्य करायला हवीकाही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावरचे केस निश्चितच निघून जाण्यास मदत होईल. 

आपला चेहरा अभिनेत्रींप्रमाणे नितळ सुंदर असावा असं आपल्याला कायमच वाटतं. पण कधी अनुवंशिकतेचा परीणाम किंवा हार्मोन्सच्या तक्रारी यांमुळे चेहऱ्याशी निगडीत काही ना काही समस्या उद्भवतातच. कधी चेहऱ्यावर खूप डाग येतात तर कधी कमी वयातच सुरकुत्या येतात. अनेकींना चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढल्याचीही तक्रार असते. आयब्रोज किंवा फारफारतर ओठांच्या वरच्या बाजूला फिकट केसांची वाढ होणे एखादवेळी ठिक आहे. पण अनेकदा हनुवटीच्या खालच्या बाजुला, गालावर असे चेहऱ्याच्या बऱ्याचशा भागात केसांची वाढ होते (Home Remedy For Facial Hair Growth). 

हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे केसांची ही वाढ होत असते. यासाठी हार्मोन्सचे संतुलन राखणे आवश्यक असते. बरेचदा हे केस इतके वाढतात की ते लपवण्यासाठी ब्लीच, थ्रेडींग, फेशियल व्हॅक्सिंग असे काही ना काही उपाय करावे लागतात. पार्लरच्या या महागड्या ट्रिटमेंटचा त्वचेवर चुकीचा परीणाम होतो आणि कालांतराने त्वचा खराब होण्याची शक्यता असते. पण चेहऱ्यावरचे केस खराब दिसत असल्याने ते काढण्यासाठी किंवा झाकण्यासाठी काही ना काही उपाय तर करावाच लागतो. अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते. पाहूया यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा कसा वापर करायचा. 

काय आहे उपाय? 

१. दोन चमचे कॉर्न फ्लोअर आणि १ चमचा खोबरेल तेल आणि २ चिमूट तुरटी एकत्र करायची. 

२. त्यामध्ये हळद आणि गुलाब पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

३. चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे ही पेस्ट लावायची. 

४. १५ मिनीटांनी चेहऱ्याला थोडे घासून पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवायचा. 

५. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावरचे केस निश्चितच निघून जाण्यास मदत होईल. 

६. मात्र हा उपाय करण्याआधी हातावर पॅच टेस्ट अवश्य करुन पाहायला हवी. त्यामुळे एखाद्या पदार्थांची अॅलर्जी असेल तर योग्य ती काळजी घेता येईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी