Join us

कोरडे-झाडूसारखे रखरखीत झालेले केस होतील मऊ, ‘हा’ हेअरमास्क करतो केसांवर जादू एका दिवसात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 19:51 IST

How To Manage Frizzy Hair During Winters : Try this nourishing winter hair masks for frizzy hair : Hair Mask for Frizzy Hair : Home Remedy For Frizzy Hair : केसांचा फ्रिझीनेस वाढल्याने साधे केस विंचरणे देखील अवघड होते, वापरुन पाहा होममेड हेअरमास्क...

सध्या वातावरणात चांगलीच कडाक्याची थंडी जाणवायला लागलेली आहे. थंडीचे दिवस म्हटल्यावर त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. हिवाळ्यात केसांची योग्य ती वेळीच काळजी (Try this nourishing winter hair masks for frizzy hair) घेतली नाही तर केसांच्या अनेक समस्या (Hair Mask for Frizzy Hair) सतावतात. हिवाळ्यात वातावरणातील गारठ्याने काहीवेळा केस अगदी कोरडे, रुक्ष, निस्तेज आणि राठ होतात. एवढंच नव्हे तर थंडीने केसांचा फ्रिझीनेस वाढतो, केसांचा फ्रिझीनेस वाढल्याने केस एकदम फुलून भांडी घासायच्या काथ्या प्रमाणेच दिसतात(Home Remedy For Frizzy Hair).

भांडी घासायचा काथ्या जसा रुक्ष - राठ असतो अगदी तशीच अवस्थता आपल्या केसांची होते. अशा केसांमध्ये लगेच गुंता देखील होतो. असा हा गुंता वाढून केसांचे सौंदर्य हरवून जाते. अशा अनेक समस्या असलेल्या केसांना पुन्हा एकदा छान सिल्की, शायनी आणि मऊ- मुलायम करायचं असेल तर आपण अनेक उपाय करुन पाहतो. या उपायांमध्ये आपण केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय देखील करुन पाहू शकतो. या घरगुती उपायांमध्ये काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण केसांचा हा फ्रिझीनेस अगदी झटपट दूर करु शकतो. हिवाळ्यात वारंवार केसांना येणारा फ्रिझीनेस दूर करण्यासाठी महागड्या शाम्पूपेक्षा या घरगुती हेअरमास्कचा वापर करुन पाहा. 

साहित्य :- 

१. खोबरेल तेल - १ टेबलस्पून २. एलोवेरा जेल - २ टेबलस्पून ३. मध - १/२ टेबलस्पून 

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

कृती :- 

एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून  खोबरेल तेल घेऊन त्यात २ टेबलस्पून एलोवेरा जेल घालावे. त्यानंतर त्यात १/२ टेबलस्पून मध घालावे. आता सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. फ्रिझी केसांसाठी घरगुती नैसर्गिक हेअरमास्क तयार आहे. 

थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

फक्त ४ स्टेप्समध्ये घरीच करा पार्लरसारखे क्लिनअप, त्वचा दिसेल सुंदर - पार्लर जाल विसरुन...

हेअरमास्क कसा वापरावा ? 

हा तयार हेअर मास्क फ्रिझी केसांवर मुळांपासून केसांच्या खालच्या टोकांपर्यंत लावून घ्यावा. त्यानंतर हा हेअर मास्क केसांवर २० मिनिटे तसाच लावून ठेवावा. मग केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावे. केस शाम्पूने धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावून कंडिशनिंग करून घ्यावे. 

हा हेअर मास्क केसांना लावण्याचे फायदे :- 

१. खोबरेल तेल :- केसांवर खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. नारळ्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडेट आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. केसांवर खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे केस अधिक मजबूत होतात.

२. एलोवेरा जेल :- केसांना एलोवेरा जेल लावल्याने केसांचे कंडीशनिंग होते आणि त्यांची चमक वाढते. याचबरोबर, केसांना ओलावा मिळतो आणि ते मऊ, रेशमी होतात. 

३. मध :- मध हे केसांसाठी खूप फायदेशीर असते. मधामुळे केसांना चमक येते, केसांची वाढ होते, आणि केसांचे आरोग्य सुधारते.                   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीथंडीत त्वचेची काळजी