Join us  

कितीही उपाय केले तरी केसगळती थांबत नाही? डॉक्टर सांगतात, करा ६ बदल, केस होतील दाट-लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 2:14 PM

Home Remedy For Hair Fall Lifestyle : जीवनशैलीतील बदल केसगळती कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

केस गळणे ही इतकी सामान्य समस्या आहे की १० पैकी किमान ८ मुली केसगळतीमुळे हैराण असतात. केस गळण्यामागे विविध कारणं असली तरी प्रामुख्याने केसांचे अपुरे पोषण, केमिकल्सचा अतिवापर, प्रदूषण ही कारण महत्त्वाची असतात. अनेकदा केसांत कंगवा फिरवला की केसांतून मोठाच्या मोठा गुंता हातात येतो. तर काही वेळा केस विंचरल्यावर जमिनीवरही प्रचंड केस पडतात. इतकेच नाही तर केस धुतल्यावरही बाथरुममध्ये मोठ्या प्रमाणात केस जमा झालेले दिसतात (Home Remedy For Hair Fall Lifestyle).

सतत केस गळत राहीले तर केस पातळ तर होतातच. पण डोक्यातही अनेक ठिकाणी विरळ जागा दिसायला लागतात. मग इतक्या मोठ्या प्रमाणात केस गळत असल्याने आपल्याला काळजी वाटायला लागते. यासाठी केवळ केसांवर उपचार न करता आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठी काही सोपे उपाय सांगतात, ते कोणते पाहूया..

(Image : Google)

१. रात्री १० वाजता झोपून सकाळी ७ वाजता उठा. झोपण्याच्या १ तास आधी आणि झोपेतून उठल्यावर १ तास मोबाईलचा अजिबात वापर करु नका.

२. केस धुतल्यानंतर लगेचच केस विंचरु नका. काही मिनीटे केस टॉवेलमध्ये बांधून ठेवा. तसेच केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर न करता ते नैसर्गिक पद्धतीने वाळवा. 

३. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना तेलाने मसाज करा. हा मसाज करताना हळूवार १० मिनीटे केल्यास केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होईल. तुम्हाला केसांना रात्रभर तेल ठेवायचे नसेल तर केस धुण्याच्या आधी २ तास तेल लावले तरी चालेल. तुमच्या केसांना सूट होणारे तेल वापरा. 

४. तुम्ही सतत तणावाखाली असाल तर केस गळण्याचे ते एक मुख्य कारण असू शकते. त्यामुळे केसगळती कमी करण्यासाठी तुमच्या ताणाचे योग्य पद्धतीने नियोजन करा. त्यासाठी नियमितपणे ध्यान, प्राणायाम, प्रार्थना करा.  

५. ९० टक्के वेळा पोषणाची कमतरता आणि हार्मोन्सचे असंतुलन ही केस गळतीची महत्त्वाची कारणे असतात. त्यामुळे आपले हिमोग्लोबिन, थायरॉईड, लिव्हर, लिपीड प्रोफाईल, व्हिटॅमिन बी १२, डी ३ मॅग्नेशियम, झिंक, इन्शुलिन आणि हार्मोन्स योग्य आहेत ना याची तपासणी करा. 

६. योग्य प्रमाणात पाणी पिणे हेही केस गळती कमी होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. 

केस वाढण्यासाठी उपयुक्त घटक

१. आवळा२. कडीपत्ता३. कोरफड४. भृंगराज५. यष्टीमधु६. जास्वंद७. ब्राम्ही८. गव्हांकुर९. खोबरे  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीलाइफस्टाइल