बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यच नसून, केस आणि त्वचेच्या निगडीत समस्या वाढतात (Hair Growth). मुख्य म्हणजे केस अधिक खराब होतात. केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे होणे, केस पातळ होणे यासह इतर समस्या निर्माण होतात (Hair Fall Oil). केसांची काळजी घेताना आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. खोबरेल तेलातील गुणधर्म केसांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
हेअर ऑइलिंग ते हेअर मास्क हेअर केअर रुटीनमध्येही खोबरेल तेलाचा वापर होतो. पण केसांसाठी फक्त खोबरेल तेल पुरेसे नसते. केसांना खोबरेल तेल लावण्यापूर्वी त्यात २ हिरवी पाने मिक्स करा. यामुळे केसांना पोषण मिळेल, शिवाय केसांच्या अनेक समस्या सुटतील. पण खोबरेल तेलात कोणते पाने मिक्स करावीत? पाहूयात(Home remedy for Hair Fall: Neem and curry leaves hair oil).
केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कोणती २ पाने मिसळावीत?
खोबरेल तेल आणि कडीपत्ता
काही महिला केसांवर थेट खोबरेल तेलाचा वापर करतात. तर, काही खोबरेल तेल कोमट करून त्याचा वापर करतात. पण फक्त खोबरेल तेलाचा वापर न करता आपण त्यात कडीपत्ता मिक्स करू शकता. कडीपत्त्यात व्हिटॅमिन सी-बी, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स आढळते. या गुणधर्मामुळे नवीन केस वाढण्यास वाव मिळतो. यासाठी एका वाटीमध्ये खोबरेल तेल घ्या. त्यात कडीपत्ता घाला. तेलाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
कोण म्हणतं टोमॅटोने टॅनिंग निघत नाही? अर्ध्या टोमॅटोला २ गोष्टी लावून रगडा; चेहरा चमकेल..
खोबरेल तेल आणि कडूलिंबाची पानं
कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीडँड्रफ, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्प क्लिन होते, व ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. केसांवर कडूलिंबाच्या पानांचा वापर करण्यासाठी, खोबरेल तेलात कडुलिंबाचे तेल मिक्स करा. तेल गरम झाल्यानंतर केसांना लावा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
थ्रेडिंग-वॅक्सिंगचा त्रास कशाला? दुधात मिसळा '४' गोष्टी; अनावश्यक केस होतील गायब-चेहरा चमकेल
खोबरेल तेलातील गुणधर्म
घनदाट निरोगी केसांसाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतात. त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्स असतात. जे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्याचे काम करते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.