Join us  

शाम्पू केल्यावरही केस तेलकट-चिकट दिसतात; ३ सोपे घरगुती उपाय, केस होतील सिल्की-मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2023 9:10 AM

Home Remedy for Oily hair After Sampoo : केस धुतले तरी ते छान कोरडे न होता चिकट झाले तर काय करावे याविषयी...

आपले केस छान भुरे आणि हवेच्या वेगावर उडणारे असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. म्हणून आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस आवर्जून धुतो.  केस धुण्याआधी आपण बरेचदा ते चांगले राहावेत यासाठी त्याला तेलाने मसाज करतो. मग शाम्पू आणि कंडीशनरचा वापर करुन ते धुतो. धुतल्यानंतर केस छान सिल्की आणि शायनी दिसतील असा आपला अंदाज असतो. पण काही वेळा धुतल्यावरही केस चिकट आणि तेलकट राहतात. असे केस घेऊन वावरणे आपल्याला अनेकदा नको होते. मग पुन्हा एकदा केसांवरुन आंघोळ करण्याचा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. पण बरेचदा आपल्या हातात तितका वेळ असतोच असे नाही आणि केस धुण्यासाठी लागणारी ताकदही नसते. अशावेळी केस सिल्की दिसावेत यासाठी काही झटपट आणि सोपे उपाय करता आले तर? पाहूयात असेच काही सोपे घरगुती उपाय (Home Remedy for Oily hair After Sampoo) ...

१. ग्रीन टी

केसांना असलेले जास्तीचे तेल निघून जाण्यासाठी ग्रीन टी चा अतिशय चांगला उपयोग होतो. ग्रीन टीची बॅग घेऊन ती एका पातेलंभर पाण्यात चांगली उकळावी. यामुळे ग्रीन टी चा अर्क या पाण्यात उतरतो. मग हे पाणी गाळून थंड होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर हे पाणी केसांना लावून साधारण १५ ते २० मिनीटांसाठी केस तसेच ठेवावेत. त्यानंतर केस धुतल्यास जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. अॅपल सायडर व्हिनेगर

केसांच्या किंवा सौंदर्याशी निगडीत बऱ्याच गोष्टींमध्ये अॅपल सायडर व्हिनेगर वापरले जाते. यासाठी एका बाऊलमध्ये अॅपल सायडर व्हिनेगर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळांशी लावावे. यामुळे केसांमध्ये राहीलेले जास्तीच तेल निघून जाण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदाच करायला हवा. 

३. मुलतानी माती 

मुलतानी माती चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण अनेकदा वापरतो. हीच माती केस हेल्दी राहण्यासाठीही उपयुक्त असते. यासाठी एका बाऊलमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात पाणी घालायचे. तुम्हाला आवडत असेल तर यात कोरफडीचा गर, रीठा पावडर, गुलाब पाणी आणि दहीही घालू शकता. हे मिश्रण केसांना लावावे आणि काही वेळाने केस धुवून टाकावेत, यामुळे केस छान कोरडे होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी