Lokmat Sakhi >Beauty > महागडे काॅस्मेटिक्स वापरुनही चेहेरा उजळत नाही? घरच्याघरी करा ३ प्रकारचे स्कीन व्हाइटनिंग सीरम, पाहा चमकदार फरक

महागडे काॅस्मेटिक्स वापरुनही चेहेरा उजळत नाही? घरच्याघरी करा ३ प्रकारचे स्कीन व्हाइटनिंग सीरम, पाहा चमकदार फरक

सौंदर्य उत्पादनं (homemade beauty products) जर घरी तयार केलेली असतील तर ती जास्त सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. त्वचा मऊसूत आणि उजळ होण्यासाठी सीरमची (serum for skin whitening) गरज असते. हे स्कीन व्हाइटनिंग सीरम घरच्याघरी 3 पध्दतीनं तयार करता येतं. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 05:44 PM2022-09-05T17:44:58+5:302022-09-05T18:10:27+5:30

सौंदर्य उत्पादनं (homemade beauty products) जर घरी तयार केलेली असतील तर ती जास्त सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. त्वचा मऊसूत आणि उजळ होण्यासाठी सीरमची (serum for skin whitening) गरज असते. हे स्कीन व्हाइटनिंग सीरम घरच्याघरी 3 पध्दतीनं तयार करता येतं. 

Home remedy for skin whitening.. 3 types of homemade serum for soft and fair skin | महागडे काॅस्मेटिक्स वापरुनही चेहेरा उजळत नाही? घरच्याघरी करा ३ प्रकारचे स्कीन व्हाइटनिंग सीरम, पाहा चमकदार फरक

महागडे काॅस्मेटिक्स वापरुनही चेहेरा उजळत नाही? घरच्याघरी करा ३ प्रकारचे स्कीन व्हाइटनिंग सीरम, पाहा चमकदार फरक

Highlightsसीरम रात्री झोपण्यापूर्वी चेहेरा स्वच्छ करुन लावावं आणि रात्रभर ठेवावं. चेहेरा उजळ करण्यासोबतच चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी,  काळे डाग काढण्यासाठी विटॅमिन इ आणि ऑलिव्ह तेलाचं सीरम फायदेशीर ठरतं. 

 त्वचेची काळजी  ( skin care) घेण्यासाठी, चेहेरा सुंदर दिसण्यासाठी आपण किती पैसे खर्च करतो. जेवढी महागडी उत्पादनं वापरु तितका परिणाम जास्त असा आपला समज असतो. पण यातून हवा तो इफेक्ट मिळत नाहीच उलट त्वचेवर साइड इफेक्ट होवून त्वचा खराब होते. त्यामुळेच त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांचा  वापर करण्याचा सल्ला दिला जातो. त्वचा ओलसर दिसावी, मऊसूत व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण त्यासाठी त्वचेला पोषणाची आवश्यकता असते. त्वचेची ही गरज सौंदर्य उत्पादनांच्या माध्यमातूनही पूर्ण करता येते. ही सौंदर्य उत्पादनं जर घरी तयार केलेली असतील तर ती जास्त सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. त्वचा मऊसूत आणि उजळ होण्यासाठी सीरमची (serum for skin whitening)  गरज असते. हे स्कीन व्हाइटनिंग सीरम (how to make serum for soft and fair skin)  घरच्याघरी 3 पध्दतीनं तयार करता येतं. 

Image: Google

गुलाब पाणी आणि काकडीचं सीरम

गुलाब पाणी आणि काकडी सीरममध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्स आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा चमकतेही. हे सीरम रात्री झोपण्याआधी चेहेऱ्यावर लावावं.
गुलाब पाणी आणि काकडी सीरम तयार करण्यासाठी 2 चमचे लेमन एक्स्ट्रॅक्ट, पाऊण कप गुलाब पाणी, 2 चमचे हळदीचा अर्क, 2 मोठे चमचे कोरफड गर, 1 छोटा चमचा बदामाचां तेल, 2 मोठे चमचे क्यूक्म्बर एक्स्ट्रॅक्ट (काकडी अर्क) घ्यावा. सर्वात आधी एका मोठ्या खोलगट वाटीत हळदीचा अर्क आणि काकडीचा अर्क एकत्र करुन घ्यावा. हळदीच्या अर्काऐवजी हळदीचं इसेन्शियल ऑइलही वापरता येतं.  नंतर यात कोरफड गर घालावा. कोरफड गर मिसळून झाला की त्यात बदामाचं तेल आणि गुलाबपाणी घालावं. मिश्रण ब्लेण्डरनं फिरवून घ्यावं. सीरम तयार झाल्यानंतर ड्राॅपर बाटली घेऊन त्यात सीरम भरावं. सर्व सामग्री एकजीव होण्यासाठी बाटली चांगली हलवून घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी चेहेरा स्वच्छ धुवून घ्यावा. हातावर थोडं सीरम घेऊन ते चेहेऱ्याला लावून रात्रभर ठेवावं. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहेरा सौम्य क्लीन्जरनं धुवावा.

Image: Google

विटॅमिन इ आणि ऑलिव्ह तेल सीरम

विटॅमिन इ आणि ऑलिव्ह तेल सीरम तयार करण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस, छोटा अर्धा चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा ऑलिव्ह तेल, 2 छोटे चमचे कोरफड गर, 1 विटॅमिन इ कॅप्सूल आणि अर्धा चमचा गुलाब पाणी घ्यावं.  सीरम तयार करताना एका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र करुन चांगली मिसळून घ्यावी. आपल्य आवश्यकतेनुसार सामग्रीचं प्रमाण कमी जास्त करता येतं. हे सीरम एका बाटलीत भरुन ठेवावं. 7 दिवस हे सीरम वापरता येतं. रोज रात्री झोपण्याआधी हे सीरम वापरल्यास त्वचा मऊ होते आणि उजळही होते. 

Image: Google

चंदन आणि बदामाच्या तेलाचं सीरम

चंदन आणि बदामाच्य तेलापासून तयार केलेल्या सीरमुळे त्वचा उजळ होते तसेच चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात. चेहेऱ्यावर असलेले काळे डाग पुसट होतात. 

चंदन आणि बदामाच्या तेलाचं सीरम तयार करण्यासाठी 30 मिलिग्रॅम बदामाचं तेल, 8 थेंब चंदन इसेन्शियल ऑइल, 4 थेंब लेमन इसेन्शिअल ऑइल घ्यावं. सीरम तयार करताना एका वाटीत सर्व सामग्री एकत्र करुन एकजीव करुन घ्यावी. मग ड्राॅपरच्या सहाय्यानं हे सीरम एका काचेच्या बाटलीत भरावं. बाटली हळूवार पण चांगली हलवून घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी चेहेरा धुवून स्वच्छ करुन 4-5 थेंब सीरम घेऊन ते चेहेऱ्यास लावावं आणि ते रात्रभर लावलेलं राहू द्यावं. सकाळी चेहेरा सौम्य क्लीन्जरनं स्वच्छ धुवावा.
 

Web Title: Home remedy for skin whitening.. 3 types of homemade serum for soft and fair skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.