Join us  

दिवसभर कपड्यांवर गळालेले केस पाहून दु:ख होतं? ‘हे’ खास तेल लावा, केस गळणारच नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 10:32 PM

Home remedy make herbal medicine oil at home to prevent hair fall : Home Remedies to Treat Hair Fall : केस गळून विरळ झाल्याने टक्कल पडेल अशी भीती वाटते, करा सोप्या घरगुती तेलाचा खास उपाय...

केस हे अतिशय नाजूक असतात. केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी वेळोवेळी त्यांची योग्य देखभाल करणे गरजेचे असते. केसांची योग्य ती स्वच्छता व काळजी न घेतल्यास केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या सगळ्या समस्यांपैकी एक कॉमन समस्या म्हणजे केसगळती. आजकाल केसगळतीची समस्या तरुणांपासून ते घरांतील वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच सतावते. केस गळणे (Hair Fall Problem) ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे; जूने केस गळतात (Magical Hair Oil For Hair Growth) आणि त्यांच्या जागेवर नवीन केस येतात. परंतू, जेंव्हा केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेंव्हा ती एक समस्या होऊन बसते(Home Remedies to Treat Hair Fall).

सतत होणारी ही केसगळती थांबवण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. केस गळती रोखण्यासाठी आपण महागडे शॅम्पू, कंडिशनर यांचा वापर करतो. एवढे करुन आपण थांबत नाही तर काही घरगुती उपायांची देखील मदत घेऊ शकतो. काही घरगुती पदार्थांचा वापर करुन आपण त्यापासून होममेड तेल तयार करुन त्याचा वापर करुन केसगळती थांबवू शकतो(Preparation of Herbal Hair Oil for Hair fall and Thick Hair). 

साहित्य :- 

१. खोबरेल तेल - अर्धा कप २. कडीपत्ता - ८ ते १० पाने३. कांदा - अर्धा कांदा बारीक चिरलेला  ४. मेथी दाणे - १ टेबलस्पून ५. अळशीच्या बिया - १ टेबलस्पून६. मोहरी - १ टेबलस्पून ७. कलौंजी - १ टेबलस्पून ८. जास्वंदीचे फुल - १ फुल 

हेअर रिमूव्हलसाठी वॅक्सिंगचे चटके कशाला सहन करता ? नैसर्गिक पदार्थ वापरुन नको असलेले केस काढा सहज... 

केसांच्या समस्यांवर शेवग्याच्या पानांचा आयुर्वेदिक पारंपरिक उपाय, केसांच्या सौंदर्यात पडेल भर... 

कृती :- 

१. एका कढईत खोबरेल तेल घेऊन त्यात कडीपत्ता, अर्धा कांदा बारीक चिरलेला, मेथी दाणे, मोहरी, कलौंजी, जास्वंदीचे फुल असे सगळे जिन्नस घालून तेल व्यवस्थित ढवळून घ्यावे. २. त्यानंतर या तेलाला एक उकळी येऊ द्यावी. ३. उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन हे तेल एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. 

४. त्यानंतर किमान २ दिवस हे तेल असेच झाकून ठेवून द्यावे. या तेलातील सगळे पदार्थ आहेत तसेच तेलात २ दिवस बुडवून ठेवावेत. जेणेकरुन त्या पदार्थांचा अर्क तेलात उतरेल. ५. दोन दिवसांसनंतर हे तेल गाळणीच्या मदतीने गाळून घेऊन एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवावे. 

केसगळती किंवा केसांच्या इतर समस्यांवर आपण हे घरगुती तेल वापरुन केसांचे अनेक प्रॉब्लेम्स दूर करु शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी