Join us  

हिवाळ्यात हातापायांवर सुरकुत्या, त्वचा रखरखीत दिसते? करा हळदीचा १ घरगुती उपाय, थंडीत त्वचा होईल मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2024 3:09 PM

Home Remedy To Prevent Dry Skin This Winter : Natural Remedy For Dry Skin In Winter : Best Home Remedy To Deal With Dry Skin In Winter : थंडीमुळे हातापायांवर सुरकुत्या पडून स्किन वयस्कर दिसत असेल तर करावा असा घरगुती उपाय...

थंडीचे दिवस आता हळुहळु सुरु झाले आहेत, वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. थंडीत आपल्या सगळ्यांनाचं एक कॉमन समस्या सतावते ती म्हणजे हिवाळ्यामुळे स्किन ड्राय होणे. उन्हाळा किंवा पावसाळा या दोन्ही ऋतुंमध्ये स्किनचा जेवढा त्रास होत नाही, तेवढा त्रास एकट्या हिवाळ्यातच होतो. स्किनच्या  बाबतीत हिवाळा अतिशय त्रासदायक असून थंडीच्या दिवसात स्किनचा सगळा पोतच खराब होतो(Natural Remedy For Dry Skin In Winter).

थंडीत एकूणच आपली संपूर्ण स्किन ड्राय (Home Remedy To Prevent Dry Skin This Winter) पडून त्यावर सुरकुत्या दिसू लागतात. यातही थंडीच्या दिवसात हातापायांची स्किन फारच कोरडी पडते. तरुण वयातही हात, पाय अक्षरश: सुरकुतलेले दिसू लागतात. भेगाळलेले, कोरडे झालेले हात - पाय चारचौघात खूपच लाज आणतात. मग असे सुरकुतलेले हात - पाय लपविण्यासाठी संपूर्ण हिवाळा हातमोजे किंवा पायात सॉक्स घालून फिराव लागत. हे अस सगळ होऊ नये, म्हणून आपण एक सोपा घरगुती उपाय नियमितपणे करु शकतो( Best Home Remedy To Deal With Dry Skin In Winter).

साहित्य :- 

१. पेट्रोलियम जेली - १ टेबलस्पून २. हळद - १/४ टेबलस्पून ३. ऑलिव्ह ऑइल - १ टेबलस्पून ४. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 

केसांना 'या' ३ पद्धतींनी एलोवेरा जेल लावा, कोंडा-केसगळती या समस्यांवर पाहा कोरफड करते कशी जादू...

कोरड्या-काळ्यानिळ्या पडलेल्या नखांवर चमकच नाही? ‘हे’ ५ उपाय करा- नखं दिसतील गुलाबी सुंदर...

कृती :- 

१. एका काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून पेट्रोलियम जेली, हळद, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस घेऊन हे सगळे मिश्रण मिक्स करून घ्यावेत. २. त्यानंतर एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये ही तयार क्रिम स्टोअर करुन ठेवावी. 

थंडीच्या दिवसात जर आपले हात - पाय फारच ड्राय होत असतील तर आपण ही क्रिम लावू शकता. यामुळे आपली स्किन मॉइश्चराइझ होण्यास मदत होईल. मॉईश्चरायझर म्हणजे थंडीच्या दिवसातला मोठा आधार असतो. त्यामुळे आंघोळ झाली की न चुकता हातापायांवर ही क्रिम आवर्जून लावा.  

केसगळती थांबतच नाही? तुम्हीसुद्धा स्ट्रेस घेताय, डॉक्टर सांगतात स्ट्रेस आणि केसगळतीचा नेमका काय संबंध...

हा घरगुती उपाय करण्याचे फायदे :-

१. हळद :- थंडीमुळे सुरकुतलेल्या स्किनवर बारीक रेषा येतात. या फाईन लाईन्स कमी करून स्किन टोन सुधारण्यास मदत करते.   

२. ऑलिव्ह ऑइल :- थंडीतील गारव्याने स्किन निस्तेज आणि निर्जीव, कोरडी - रुक्ष झाली असेल तर ऑलिव्ह ऑइल लावणे फायदेशीर ठरते. 

३. लिंबाचा रस :- लिंबातील अँटिऑक्सिडंट्स स्किनमधील कोलेजन वाढवतात आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजीत्वचेची काळजी