Join us  

डाय न लावता पांढरे झालेले केस काळे करण्याची सोपी ट्रिक, केस दिसतील मस्त काळेभोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2023 7:00 PM

Home Remedy to Turn White Hairs Into Black Without Hair Dye : कमी वयात केस पांढरे होण्यामागे ताणतणाव, अनुवंशिकता, शरीरात काही घटकांची कमतरता असणे, केमिकल्सचा अतिवापर अशी बरीच कारणे असू शकतात

कमी वयात केस पांढरे होणे ही गेल्या काही वर्षातील अतिशय सामान्य समस्या आहे. केस पांढरे झाल्यामुळे हैराण झालेले बरेच जण आपल्या आजुबाजूला दिसतात. एकदा केस पांढरे झाले की त्यांना हेअर कलर करणे हा एकच उपाय आपल्याकडे राहतो. कलर केल्याने पांढऱ्या केसांची संख्या वाढत जाते. बाजारात मिळणारे डाय किंवा हेअर कलर आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. त्यामुळे केसांचा पोत तर खराब होतोच पण त्वचेच्या तक्रारी, अंगावर रॅश येणे किंवा इतरही काही त्रास होण्याची शक्यता असते. कमी वयात केस पांढरे होण्यामागे ताणतणाव, अनुवंशिकता, शरीरात काही घटकांची कमतरता असणे, केमिकल्सचा अतिवापर अशी बरीच कारणे असू शकतात (Home Remedy to Turn White Hairs Into Black Without Hair Dye).  

तरुण वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण सध्या वेगाने वाढल्याचे दिसते. एकदा हे केस पांढरे झाले की सगळे आपल्याला म्हातारी म्हणून चिडवायला लागतात. कमी वयातच केस पांढरे झाल्यामुळे आपण तणावात येतो आणि या केसांचे प्रमाण वाढायला लागले की मग काय करायचे आपल्याला काहीही सुचत नाही. डाय लावण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. नेहा जिंदाल इझी स्मार्ट वे या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी यासाठी अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय कसा करायचा पाहूया...

(Image : Google)

१. एक चमचा आवळा पावडर, अर्धा चमचा कॉफी, दिड चमचा काळे तीळ मिक्सरच्या भांड्यात एकत्र करावे. 

२. यामध्ये दिड चमचा मेथ्या घालून हे सगळे मिक्सरमध्ये चांगले बारीक करुन घ्यावे. 

३. गॅसवर कढई घेऊन त्यात १०० मिलीग्रॅम मोहरीचे तेल घ्यावे, त्यामध्ये मिक्सर केलेली ही पावडर घालावी आणि अर्धा चमचा मेहेंदी घालावी. 

४. हे सगळे एकत्र चांगले शिजवून घ्यावे. त्यानंतर झाकण ठेवून ४ ते ५ तास तसेच ठेवावे. 

५. गार झाल्यानंतर हे मिश्रण गाळून एका बरणीत भरुन ठेवावे. आठवड्यातून २ वेळा शाम्पू करायच्या आधी हे मिश्रण केसांना लावावे.  

६. यामुळे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यास चांगली मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमेकअप टिप्स