हिवाळा सुरू झाला की त्वचेची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. कोरडी त्वचा लवकर टॅन होते. त्यामुळे त्वचेला व्यवस्थित हायड्रेटेड ठेवण्याची गरज असते. यासाठी मग आपण बाजारात विकत मिळणारे वेगवेगळे महागडे क्रिम वापरतो. पण त्यामुळे बऱ्याचदा पाहिजे तसा फरक त्वचेमध्ये दिसून येत नाही (Winter Skin Care Tips). त्यासाठीच आता ४ ते ५ बदाम घ्या आणि घरच्याघरी त्याचं मॉईश्चरायझिंग क्रिम तयार करा. अशा पद्धतीचं अतिशय शुद्ध आणि कोणतीही भेसळ किंवा केमिकल्स नसणारं जर बदाम क्रिम तुम्ही रोज वापरलं तर काही दिवसांतच तुमची त्वचा अतिशय नितळ, स्वच्छ होऊन चमकू लागेल (how to make almond cream at home?). शिवाय त्वचेवरचे पिगमेंटेशन, ॲक्ने कमी होण्यासाठीही या बदाम क्रिमचा उपयोग होईल.(homemade almond cream for reducing dryness and tanning of skin in winter)
घरच्याघरी बदाम क्रिम कसं तयार करावं?
घरच्याघरी बदाम क्रिम कसं तयार करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ beautyremedies_drshobna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
एकदशीच्या उपवासाला करा चटपटीत मखाना भेळ! तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा करा काहीतरी वेगळं
यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ४ ते ५ बदाम घ्या आणि ते रात्रभर पाण्यात भिजत घाला. यानंतर बदामाची टरफलं काढून टाका.
त्यानंतर बदाम आणि ४ टीस्पून रोज वॉटर किंवा गुलाबजल मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या.
आता भांड्यामध्ये जी गाळून घेतलेली पेस्ट जमा झाली असेल त्यापासून आपल्याला क्रिम तयार करायचं आहे. त्यासाठी त्या पेस्टमध्ये ३ टीस्पून ॲलोव्हेरा जेल, १ टीस्पून ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल टाका.
केळीचं साल घेऊन फक्त चेहऱ्यावर चोळा, सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मिळतील ५ जबरदस्त फायदे
सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि ते एका एअरटाईट डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. हे क्रिम तुम्ही ७ ते ८ दिवस वापरू शकता.
रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हे घरगुती बदाम क्रिम लावून चेहऱ्याला मालिश करा. काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान बदल दिसून येईल.