Lokmat Sakhi >Beauty > लांब-सिल्की केस हवे पण केसांचा झाडू झाला? या पद्धतीनं लावा एलोवेरा तेल; कंबरेपर्यंत वाढतील केस

लांब-सिल्की केस हवे पण केसांचा झाडू झाला? या पद्धतीनं लावा एलोवेरा तेल; कंबरेपर्यंत वाढतील केस

Homemade Aloe vera Hair Oil For Long Hairs : केसांना हेल्दी ठेवण्यासाठी एलोवेरा तेल बनवू शकता.  एलोवेरात अनेक पोषक तत्व असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:25 PM2024-10-25T16:25:11+5:302024-10-25T16:31:04+5:30

Homemade Aloe vera Hair Oil For Long Hairs : केसांना हेल्दी ठेवण्यासाठी एलोवेरा तेल बनवू शकता.  एलोवेरात अनेक पोषक तत्व असतात.

Homemade Aloe vera Hair Oil For Long Hairs :Aloe vera And Coconut Oil For Hairs Growth | लांब-सिल्की केस हवे पण केसांचा झाडू झाला? या पद्धतीनं लावा एलोवेरा तेल; कंबरेपर्यंत वाढतील केस

लांब-सिल्की केस हवे पण केसांचा झाडू झाला? या पद्धतीनं लावा एलोवेरा तेल; कंबरेपर्यंत वाढतील केस

आजकालची लाईफस्टाईल अशी आहे की याचा प्रत्येकाच्याच आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत होते. कोरड्या केसांमुळे केस गळण्याची समस्या सुरू येते. केसांच्या या समस्या टाळण्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्स उत्पादनांचा वपर केला जातो. (Aloe Vera And Coconut Oil For Hairs Growth) पण नैसर्गिक पद्धतीनं केस लांब आणि  हेल्दी राहतात. केसांना हेल्दी ठेवण्यासाठी एलोवेरा तेल बनवू शकता.  एलोवेरात अनेक पोषक तत्व असतात. (Aloe Vera And Coconut Oil For Hairs Growth)

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही केसांना एलोवेरा जेल लावू शकता. एलोवेरा जेलमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. घरच्याघरी तेल केसांना लावण्याचे तेल कसे बनवायचे ते पाहू. एलोवेरामध्ये व्हिटामीन ए, सी आणि ई असते. हेल्दी सेल्सच्या हेअर ग्रोथमध्ये मदत होते  ज्यामुळे केस  शायनी राहतात. व्हिटामीन बी-१२ आणि फॉलिक एसिड केस गळण्यापासून वाचवते.

एलोवेरा तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एलोवेराची पानं सोलून त्यातलं जेल काढून घ्या. नंतर यात नारळाचं तेल मिसळा. नंतर हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. व्यवस्थित गरम करून घ्या. जोपर्यंत रंग ब्राऊन होत नाही तोपर्यंत गरम करा. मग थंड करून एका ग्लासमध्ये गाळून घ्या. घरगुती एलोवेरा जेलचे तेल तयार आहे. 

बाल्कनीत कुंडीत लिंबाचं रोप लावलं तर ते जगतं का? रसदार लिंबू हवेत तर ‘अशी’ घ्या काळजी

एलोवेरा तेलाचा वापर करण्याआधी केस दोन भागांत विभागून घ्या. नंतर स्काल्पवर तेल लावा. हे ३० मिनिटं लावून हलक्या हातानं मसाज करा.  नंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवून घ्या. हे तेल तुम्ही आठवड्यातून २ वेळा लावू शकता. एलोवेरा तेल लावल्यानं अनेक फायदे मिळतात जसं की कोंड्याची समस्या उद्भवत नाही. एलोवेरा स्काल्पमधून डेड लेअर काढून टाकते. हे नॅच्युरल क्लिंजरचं काम करते ज्यामुळे केस हेल्दी राहतात.

Web Title: Homemade Aloe vera Hair Oil For Long Hairs :Aloe vera And Coconut Oil For Hairs Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.