Join us  

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर... त्वचा दिसेल तरुण- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 6:52 PM

Use Of Jaggery For Tanned Skin: गूळ खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तो त्वचेला लावण्याचेही आहेत. म्हणूनच तर त्वचेसाठी गुळापासून ॲण्टीएजिंग फेसवॉश (jaggery anti-aging facewash) कसा तयार करायचा, याची ही खास पद्धत..

ठळक मुद्देगुळाचा फेसवॉश कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय याची खास माहिती

आपल्या स्वयंपाक घरातच अशा अनेक वस्तू असतात, ज्यांचा उपयोग खरोखरंच आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी होऊ शकतो. काही गोष्टी केसांसाठी फायदेशीर ठरतात तर काही पदार्थ त्वचेला पोषण देऊन अधिक मुलायम, तजेलदार करतात. गूळ हा त्यातलाच एक पदार्थ. आरोग्यासाठी गूळ खाणं किती पोषक आहे, हे तर आपण जाणतोच. आता तोच गुळ एका खास पद्धतीने चेहऱ्यावर लावून बघा (gud or jaggery face pack). गुळापासून तयार करण्यात येणारा हा घरगुती ॲण्टीएजिंग फेसवॉश (antiaging facewash) त्वचेचा पोत सुधारण्यास नक्कीच फायदेशीर ठरतो. गुळाचा फेसवॉश (Jaggery face pack for glowing skin) कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय याची माहिती इन्स्टाग्रामच्या beautyandhairsecrets या पेजवर शेअर करण्यात आली आहे. (how to reduce fine lines or wrinkles?)

 

गुळाचा फेसवॉश लावण्याचे फायदे (Benefits of jaggery face wash)- गुळामध्ये असणारे पौष्टिक घटक त्वचेचं पोषण करून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात.- जेव्हा काही कार्यक्रम असेल आणि पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वेळ नसेल, तेव्हा हा गुळाचा फेसवॉश वापरून बघा. यामुळे त्वचा लगेचच चमकदार दिसू लागते.- उन्हात फिरल्याने किंवा प्रदुषणामुळे त्वचा टॅन होते. अशी काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी गुळाचा फेसवॉश अतिशय उपयोगी ठरतो.- हा फेसवॉश एखाद्या स्क्रबप्रमाणे काम करतो. त्यामुळे डेड स्किन काढून टाकण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.- गुळाच्या फेसवॉशचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे चेहऱ्यावर अकाली दिसून येणाऱ्या फाईन लाईन्स म्हणजेच सुरकुत्या कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होताे. कारण स्किन टाईटनिंगसाठी हा फेसवॉश मदत करतो.

 

कसा करायचा गुळाचा फेसवॉश?- यासाठी आपल्याला गुळाचा लहान खडा, १ टेबलस्पून पाणी, १ टेबलस्पून दही आणि १ टेबलस्पून हरबरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन एवढं साहित्य लागेल.

वेटलॉससाठी उपयुक्त २ डिटॉक्स ड्रिंक्स, वजन कमी आणि त्वचाही होईल सुंदर- देखणी- सगळ्यात आधी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात गुळाचा खडा टाका.- गुळाचा खडा पाण्यात विरघळला की त्यात दही आणि हरबरा डाळीचं पीठ टाका.- सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं की गुळाचा फेसवॉश झाला तयार.

कसा करायचा वापर?- या फेसवॉशचा वापर करण्याआधी चेहरा ओलसर करून घ्या.

जेनिफर लोपेजच्या सौंदर्याचे सिक्रेट! जेनिफरच सांगतेय सुंदर त्वचेसाठी ५ टिप्स- नंतर फेसवॉश चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने संपूर्ण चेहऱ्यावर ५ ते ७ मिनिटे मसाज करा.- यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी चेहरा तसाच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.- चेहरा धुतल्यानंतर त्यावर तुमचे नेहमीचे मॉईश्चरायझर किंवा ॲलोव्हेरा जेल लावून चेहरा हायड्रेटेड ठेवा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी