Join us  

घरच्या घरी पार्लरसारखी बोटॉक्स ट्रिट्मेंट् करण्यासाठी सोपी ट्रिक, त्वचेवरील सुरकुत्या, एजिंगचे मार्क्स होतील नाहीसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 7:15 PM

Homemade Anti-Wrinkle Face Mask, Natural Botox Effect : पार्लरमध्ये जाऊन महागडी बोटॉक्स ट्रिट्मेंट् करण्यापेक्षा घरच्या घरी घरगुती साहित्यात अगदी १० मिनिटांत करा बोटॉक्स ट्रिट्मेंट्...

आपले एकूणच व्यक्तिमत्व हे सुंदर, उठावदार आणि चारचौघात उठून दिसावे असे असावे, असे सगळ्यांना वाटते. आपली त्वचा सुंदर दिसावी, तजेलदार असावी असं प्रत्येकाला वाटत असते. यासाठी बहुतेकजणी पार्लरमध्ये उपलब्ध असणाऱ्या सौंदर्य प्रसाधन आणि त्वचेशी संबंधित औषध उपचार व ट्रिटमेंट्स घेण्यावर जास्त भर देतात. आपण पार्लरमध्ये (Homemade Organic Anti-Ageing Botox Face Mask) जाऊन फेशियल, क्लिनअप किंवा अनेक बेसिक ट्रिटमेंट्स या दर महिन्याला आवर्जून करून घेतो. पार्लरमध्ये असणाऱ्या या अनेक छोट्या - मोठ्या ट्रिटमेंट्स करुन आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो(Wrinkle Removing Natural BOTOX Face Mask).

 बोटॉक्स ट्रिट्मेंट ही या सौंदर्य प्रसाधनांच्या ट्रिटमेंट्सपैकी एक महत्वाची व वेदनारहित ट्रिटमेंट् आहे. ही एक प्रकारची अँटीएजिंग ट्रिटमेंट् आहे. सध्याच्या काळात विशेषतः तरुणींमध्ये ही ट्रिटमेंट एक चर्चेचा विषय ठरली आहे. बोटॉक्स उपचारांचा वापर सामान्यत: फाईन लाईन्स, सुरकुत्या आणि त्वचा निस्तेज होऊ नये म्हणून केली जाते. एवढंच नाही तर एखाद्याला ओठ आणि गालांचा आकार बदलायचा असेल  तर त्यासाठीही बोटॉक्स ट्रिटमेंट (4 Natural Recipes That Work Just as Good as Botox) खूप प्रभावी आहे. बोटॉक्स ट्रिटमेंट (Homemade Anti-Wrinkle Face Mask, Natural Botox Effect) ही आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त असली तरीही ही महागडी ट्रिटमेंट असल्यामुळे ती सगळ्यांनाच करणे शक्य होत नाही. अशावेळी आपण किचनमधील काही पदार्थांचा वापर करुन झटपट घरच्या घरी पार्लरसारखी बोटॉक्स ट्रिटमेंट घेऊ शकतो(Homemade Anti-Wrinkle Face Mask, Natural Botox Effect).

बोटॉक्स ट्रिट्मेंट म्हणजे काय ? 

वाढत्या वयानुसार, चेहऱ्यावर बारीक रेषा दिसू लागतात कारण जेव्हा त्वचेचा घट्टपणा कमी होतो तेव्हा त्वचा सैल होऊ लागते, त्यामुळे चेहेऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.आजकाल चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवण्यासाठी 'बोटॉक्स' या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. चेहऱ्याचे हावभाव चेहऱ्याला जिवंतपणा आणतात.

नखांवर मेहेंदीचा रंग चढून ती लालेलाल दिसतात ? २ सोप्या ट्रिक्स, नखांवरचा मेहेंदीचा रंग उतरेल...

गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?

चेहऱ्याला जिवंत करायचे काम चेहऱ्याच्या त्वचेखाली असणारे असंख्य स्नायू बेमालूम करत असतात. हे स्नायू आपल्या मनाच्या विचारांचे प्रतिबिंब भावनांच्या स्वरूपात चेहऱ्यावरील त्वचा विशिष्ट पद्धतीने सरकवून प्रदर्शित करतात; परंतु वय वाढायला लागले, की हीच त्वचा सैल पडू लागते. त्याखालचे स्नायू शिथिल असतानासुद्धा त्वचा सैल पडून त्यावर सुरकुत्या पडायला लागतात. सुरकुतलेला चेहरा थकलेला, वृद्ध आणि कोमेजलेला दिसतो. चेहऱ्यावरच्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी 'बोटॉक्स ट्रिटमेंट्सचा' उपयोग होतो.

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

घरच्या घरी बोटॉक्स ट्रिट्मेंट कशी करावी ? 

१. बोटॉक्स ट्रिट्मेंटने वाढलेले वय, चेहऱ्यावरील सुरकुत्या, एजिंगच्या खुणा, सुरकुतलेली त्वचा यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु ही ट्रिटमेंट अतिशय महाग असल्याने प्रत्येकालाच ती पार्लरमध्ये जाऊन करता येऊ शकेल असे होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करून घरच्या घरी ही पार्लरसारखी 'बोटॉक्स' ट्रिटमेंट करु शकतो. 'बोटॉक्स' ट्रिटमेंट घरच्या घरी करण्यासाठी १ टेबलस्पून चिया सिड्स, ३ टेबलस्पून दूध, १ टेबलस्पून  एलोवेरा जेल व १/२ टेबलस्पून मध हे सर्व साहित्य लागते. 

२. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये चिया सिड्स व दूध एकत्रित भिजवून अर्ध्या तासासाठी ते तसेच बाजूला ठेवून द्यावे. हे मिश्रण अर्धा तास व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. आता या तयार पेस्टमध्ये मध व एलोवेरा जेल मिसळून घ्यावे. आपला बोटॉक्स फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार आहे. 

३. आता हा तयार झालेला बोटॉक्स फेसपॅक चेहऱ्यावर लावून घ्यावा. फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करुन घ्यावा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर संपूर्ण सुकेपर्यंत १० ते १५ मिनटे वाट बघावी.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स