बीटरुट आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे, हे तर आपण जाणतोच. त्यातून मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी, फोलेट, प्रोटिन्स, फायबर मिळतात. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्याने ज्या लोकांना कायम अशक्तपणा जाणवतो, अशांनाही नियमितपणे बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीरासाठी अतिशय पोषक असणारे बीट त्वचेसाठीही उत्तम ठरते (Homemade Beetroot Cream For Glowing Skin).
त्यामुळे काळवंडलेली त्वचा (How to remove darkspots) चमकदार तर होतेच, पण त्वचेला इतरही अनेक फायदे होतात (best antiaging treatment). त्वचेसाठी गुणकारी ठरणारे बीटरुटचे क्रिम घरच्याघरी तयार करणे अगदी सोपे आहे (Benefits of Beet for Skin). ते कसे करायचे आणि त्यासाठी कोणते साहित्य वापरायचे, हे आपण पाहूया. हा सौंदर्योपचार beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
बीटरुट क्रिम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य(How to make Homemade Beetroot Cream?)१. एक बीट रुट
२. अर्धा ग्लास पाणी
३. १ टीस्पून बडिशेप
४. १ टीस्पून गुलाब पाणी
५. २ टीस्पून ॲलोव्हेरा जेल
बीटरुट क्रीम तयार करण्याची पद्धत१. सगळ्यात आधी बीटरुट स्वच्छ धुवून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
२. त्यानंतर त्या फोडी एका पातेल्यात टाका आणि त्यात फोडी बुडतील एवढेच पाणी टाका.
३. हे मिश्रण २ ते ३ मिनिटे गरम करून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. त्यात बडिशेपाचे दाणे टाका आणि पातेल्यावर झाकण ठेवून द्या.
४. १० मिनिटांनी हे मिश्रण गाळून घ्या. गाळलेल्या मिश्रणात गुलाब पाणी आणि ॲलोव्हेरा जेल टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा. बाटलीचे झाकण घट्ट असावे. ही बाटली फ्रिजमध्ये ठेवून द्या. पुढील ७ दिवस हे क्रीम वापरता येते.
क्रीम वापरण्याची पद्धत आणि त्याचे फायदे(Benefits of Beet for Skin)- तयार केलेले क्रिम दिवसांतून एकदा हलक्या हाताने मसाज करून चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटे त्वचेवर राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका.
- हे क्रीम नियमित वापरल्यामुळे काळवंडलेली त्वचा चमकदार होईल.
- डार्क स्पॉट्स किंवा डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- त्वचेवर अकाली सुरकुत्या येणे कमी होईल आणि त्वचा चमकदार दिसेल.