Join us

चमचाभर बेसनाचे ३ फेसपॅक, त्वचा होईल नितळ आणि स्पॉटलेस चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2023 17:00 IST

Homemade Besan Face Packs For Glowing Skin उन्हाळ्यातील त्वचेची समस्या होईल छुमंतर, चमचाभर बेसन फेस पॅकचा करा असा वापर, दिसाल सुंदर

स्किन केअर अत्यंत महत्वाची आहे. यासाठी लोकं विविध उपाय करून पाहतात. प्रत्येक ऋतूनुसार स्किनच्या निगडीत समस्या देखील बदलत राहतात. उन्हाळ्यात स्किनच्या समस्या वाढत जातात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही लोकं विविध उत्पादनांवर भरपूर पैसे खर्च करतात. काहीवेळेला त्याचे परिणाम हवे तसे मिळत नाहीत.

उन्हाळ्यातील त्वचेच्या निगडीत समस्या सोडवायच्या असतील तर, बेसनाचा उपाय करून पाहा. बेसन फेस पॅक त्वचेतील अनेक समस्या दूर करण्यास मदत करेल. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस तर दूर होतातच, यासह टॅनिंग, मुरूम, डाग, या समस्येपासूनही सुटका मिळेल(Homemade Besan Face Packs For Glowing Skin).

बेसन - दूध फेस पॅक

चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकायचे असतील तर, बेसन - दूध फेस पॅकचा वापर करून पाहा. यासाठी एका वाटीत ४ चमचे बेसन, १ चमचा हळद, १ चमचा मिल्क क्रिम, ३ चमचे दूध घालून मिश्रणाची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. फेस पॅक सुकल्यानंतर अपोसिट साइडने पेस्ट काढा. यामुळे चेहऱ्यावरील केस निघून जातील. आपण या फेस पॅकचा वापर महिन्यातून ३ ते ४ वेळा करू शकता.

कानाची छिद्र मोठे झाले, कान ओघळले? १ उपाय - कानातले लोंबणार नाहीत..

बेसन - संत्र्याच्या सालींचा फेस पॅक

चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग काढण्यासाठी हा फेस पॅक मदत करेल. यासाठी एका वाटीत २ चमचे बेसन, चिमुटभर हळद, संत्र्याच्या सालींची पेस्ट किंवा पावडर, घालून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. व सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण या फेस पॅकचा वापर महिन्यातून ४ वेळा करू शकता.

आंघोळीच्या पाण्यात ४ गोष्टी मिसळा, दिवसभर वाटेल फ्रेश- स्किन प्रॉब्लम्स छळणार नाहीत

बेसन - गुलाब पाणी फेस पॅक

गुलाब पाण्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. यासाठी एका वाटीत चार चमचे बेसन पीठ, दोन चमचे गुलाब पाणी आणि अर्धा चमचा हळद घालून मिश्रण मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा, व २० मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. या पॅकमुळे आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसेल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल