केसांच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच समस्य़ा असतात. कधी केस खूप गळतात तर कधी केस रुक्ष-कोरडे होतात. कधी केस कमी वयात पांढरे होतात तर कधी केसांत प्रमाणाबाहेर कोंडा होतो. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण सतत काही ना काही बाह्य उपचार करत असतो. पण केसांचे शरीरातून योग्य पद्धतीने पोषण झाल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. शरीरातून केसांचे पोषण व्हावे यासाठी आहारात बदल करणे आवश्यक असते. आपण खाल्लेल्या अन्नघटकांतून केसांना पोषण मिळण्यास मदत होते. घरच्या घरी केलेले बायोटीन ड्रींक नियमित घेतल्यास केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आता हे बायोटीन ड्रींक म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करायचं समजून घ्यायला हवं (Homemade Biotin Drink for hair growth).
कसे बनवायचे बायोटीन ड्रींक ?
१. एका भांड्यात १ ग्लास म्हणजे ३०० एमएल पाणी घ्यायचे आणि ते उकळायला ठेवायचे.
२. त्यामध्ये अर्धा चमचा जीरे, अर्धा चमचा जवस आणि १२ ते १५ कडीपत्त्याची पाने घालायची.
३. हे सगळे बारीक गॅसवर अर्धे होईपर्यंत चांगले उकळायचे.
४. गॅस बंद झाल्यावर हे मिश्रण एका ग्लासमध्ये गाळणीने गाळायचे आणि कोमट असतानाच पिऊन घ्यायचे.
५. आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये लिंबू, मध असे काहीही एकत्र करु शकता.
६. जेवण झाल्यावर दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेस हे ड्रींक प्यायचे, अवघ्या १५ दिवसांत तुम्हाला केसांतील फरक दिसून येण्यास मदत होईल.
फायदे
१. कोंडा किंवा केसांमध्ये खपल्या झाल्या असतील तर त्या बऱ्या होण्यास मदत होते.
२. केसांचे गळणे अतिशय वेगाने कमी होण्यास या ड्रींकची चांगलीच मदत होते.
३. केस दाट आणि जाड होण्यासाठी हे ड्रींक फायदेशीर असते.
४. केस दिर्घकाळ काळे राहावेत यासाठी हे ड्रींक घेण्याचा फायदा होतो.
५. केसांचे आयुष्य वा़ढवण्याबरोबरच शरीर डीटॉक्स करण्यासाठी या ड्रींकचा चांगला फायदा होतो.