Lokmat Sakhi >Beauty > रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!

रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!

Homemade Biotin Powder for Hair loss, check out recipe : केस वाढतील आणि गळणे थांबतील असा एक सोपा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 03:53 PM2023-12-29T15:53:17+5:302023-12-29T16:00:06+5:30

Homemade Biotin Powder for Hair loss, check out recipe : केस वाढतील आणि गळणे थांबतील असा एक सोपा घरगुती उपाय

Homemade Biotin Powder for Hair loss, check out recipe | रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!

रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!

लोकांचं सौंदर्य हे त्यांच्या केसांवर असते (Hair Care Tips), असे म्हटले जाते. दाट केसांमुळे चेहऱ्याची शोभा वाढते. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःच्या केसांची निगा राखण्यास वेळ मिळत नाही. ज्यामुळे केस गळती, केसात कोंडा, केस पांढरे होणे, यासह इतर समस्या निर्माण होतात. केसांची निगा राखताना फक्त बाहेरून नसून, आहारात देखील काही बदल करणं गरजेचं आहे.

जर आपण योग्य प्रमाणात पौष्टीक आहाराचे सेवन करत नसाल तर, केसांची बाहेरून किती ही निगा राखली, तरी केसांची गळती थांबणार नाही. शिवाय हिवाळ्यात केस गळतीची समस्या प्रचंड वाढते. ज्यामुळे केस अधिक पातळ होतात. जर आपल्याला केस गळतीपासून सुटका हवी असेल तर, आहारात बायोटिनचा समावेश करा. आता बायोटिन म्हणजे काय? केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी बायोटिन मदत करते का?(Homemade Biotin Powder for Hair loss, check out recipe).

बायोटिन म्हणजे काय?

बायोटिन हे खरं तर व्हिटॅमिन बी चा एक प्रकार आहे. याला व्हिटॅमिन बी७ असेही म्हणतात. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, जे बी-कॉम्प्लेक्स गटाचा भाग आहे. केस, त्वचा आणि नखे यांच्या आरोग्यासाठीही बायोटिन पावडरचा वापर केला जातो. जर आपल्याला निरोगी केस हवे असतील तर, बायोटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

घरीच करता येईल २ बदामांचं काजळ, डोळे दिसतील पाणीदार-सुंदर- केमिकलचाही धोका नाही

घरात तयार करा बायोटिन पावडर

बायोटिन पावडर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

- अर्धा कप ड्रायफ्रुट्स पावडर (बदाम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि अक्रोड)

- अर्धा कप ओट्स

- अर्धा कप मूग आणि चणा डाळ

- अर्धा चिया सीड्स

- अर्धा कप फ्लेक्ससीड्स

बायोटिन पावडर तयार करण्याची कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात सुकामेवा घेऊन त्याची पावडर तयार करा. त्यानंतर त्यात ओट्स घालून पावडर तयार करा. पॅनमध्ये चणा डाळ आणि मूग डाळ घालून भाजून घ्या. डाळींची देखील दरदरीत पावडर तयार करा. त्यांनतर चिया सीड्स आणि फ्लेक्ससीड्सची देखील पावडर तयार करा. एका बाऊलमध्ये सर्व पावडर घेऊन मिक्स करा. मिक्स केलेली पावडर एका हवाबंद डब्यात झाकून ठेवा. अशा प्रकारे बायोटिन पावडर रेडी.

ड्राय स्किन-केस गळतीला वैतागलात? आंघोळीच्या पाण्यात टाका चमचाभर मीठ, मग पाहा जादू..

अशा प्रकारे बायोटिन पावडरचा करा वापर

बायोटिन पावडरचा वापर आपण स्मुदी किंवा चहा तयार करण्यासाठी करू शकता. किंवा कोमट पाण्यात एक चमचा बायोटिन पावडर घालून मिक्स करा, आणि प्या. आपण याचे सेवन सकाळी केलं तर, नक्कीच याचा फायदा केसांना होईल, शिवाय आरोग्यही सुधारेल.

Web Title: Homemade Biotin Powder for Hair loss, check out recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.