Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल...

चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल...

Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin : How to make a blueberry face pack : Blueberry for Skin : महागडे क्रिम लावूनही चेहऱ्याच्या त्वचेचा पोत बिघडलेलाच, हा उपाय करुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 02:10 PM2024-10-11T14:10:33+5:302024-10-11T14:23:16+5:30

Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin : How to make a blueberry face pack : Blueberry for Skin : महागडे क्रिम लावूनही चेहऱ्याच्या त्वचेचा पोत बिघडलेलाच, हा उपाय करुन पाहा...

Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin How to make a blueberry face pack Blueberry for Skin | चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल...

चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल...

बाजारांत मिळणारे ब्लूबेरीज हे निळ्या रंगाचे इवलुसे फळं आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील गुणकारी आहे. ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'के', पोटॅशियम, मँगनीज, फायबर फार मोठ्या प्रमाणांत असते. याचबरोबर हे फळं अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. असे हे चवीला आंबट गोड असणारे फळ आपण आपल्या स्किन केअर (How to make a blueberry face pack) रुटीनमध्ये देखील वापरू शकतो. आपण शक्यतो ब्लूबेरीज खूप महाग असल्याने विकत घेत नाही. हे इवलुसे फळं दिसायला जितके सुंदर असते तितकेच त्याचे फायदे देखील अनेक आहेत(Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin).

अनेकदा बाहेरचे प्रदूषण, धूळ, माती यामुळे आपला स्किन टोन आणि त्वचेचे टेक्शचर खराब होते. यामुळे आपल्याला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सतत होणाऱ्या अनेक स्किन प्रॉब्लेम्स पासून आराम मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करुन पाहतो. या उपायांमध्ये आपण काही घरगुती उपाय देखील करतो. या घरगुती उपायांमध्ये आपण चक्क ब्लूबेरीजचा (Blueberry for Skin) वापर देखील करु शकता. ब्लूबेरीज फेसमास्कचा वापर करून आपण स्किन टोन आणि त्वचेचे टेक्शचर सुधारु शकता. ब्लूबेरीजच्या पल्पचा वापर करून आपण घरगुती फेसमास्क तयार करु शकता. ब्लूबेरीज वापरून आपण नेमकं हा फेसमास्क कसा तयार करु शकता ते पाहूयात(How to Make Blueberry Face Pack at Home).      

साहित्य :- 

१. ब्लूबेरीजचा पल्प - ४ ते ५ (ब्लूबेरीजचा पल्प) 
२. मध - १ टेबलस्पून 
३. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ?  

हा फेसमास्क तयार करण्यासाठी सगळ्यातआधी ब्लूबेरीज घेऊन त्या कापून त्यातील बिया काढून घ्याव्यात. बिया काढून घेतलेल्या या ब्लूबेरीज एका मिक्सरजार मध्ये घेऊन त्या व्यवस्थित ब्लेंड करून त्यांचा पल्प करुन घ्यावा. हा पल्प एका बाऊलमध्ये काढून त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून तांदुळाचे पीठ व मध घालून हे सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे.  

नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...


चेहरा सतत ड्राय-कोरडा दिसतो? क्रिती सेनॉन सांगते या खास'पांढऱ्या' फेसमास्कची कमाल-चेहरा चमकतो सतत...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला जांभळ्या रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.    

तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर अशी करेल जादू, दिवाळीत त्वचा चमकेल-नव्या दिसाल तुम्ही!

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. ब्लूबेरीजचा पल्प :- ब्लूबेरीमध्ये ८५ % पाणी असते, यामुळेच त्वचेला हायड्रेटिंग ठेवण्यासाठी ब्लूबेरीज फायदेशीर असतात. याचबरोबर त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यात व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. त्वचेवरील वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी ब्लूबेरीज पल्प लावणे फायदेशीर ठरते. 

२. मध :- मधात अनेक महत्वपूर्ण अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला हिलिंग करण्यास मदत करतात. मध  त्वचेच्या जळजळीपासून आराम मिळवून देऊन त्वचा थंड ठेवण्यास मदत करते. मध त्वचेवरील काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यास उपयुक्त ठरते. 

३. तांदुळाचे पीठ :- तांदळाचे पीठ त्वचेवर लावल्याने त्वचेवर एंटी एजिंग इफेक्ट दिसून येतात. तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डीसह फायबरची मात्रा भरपूर आहे. तसंच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची आतून खोलवर स्वच्छता होते.

Web Title: Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin How to make a blueberry face pack Blueberry for Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.