Join us  

केस गळतात-कपाळ मोठं दिसतंय? जेवताना चमचाभर ही चटणी खा, लांबसडक दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 3:03 PM

Homemade Chutney For Hair Fall Control : तुम्हीसुद्धा केसांच्या समस्येनं त्रस्त असाल तर तेल किंवा शॅम्पू नाहीतर एक स्पेशल चटणी वापरून तुम्ही केसांचं गळणं कमी करू शकता.

सध्याच्या स्थितीत व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना केसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. काहींचे  केस गळतात तर काहीजणांचे तारूण्यातच केस पांढरे होतात. इतकंच नाही तर स्टायलिंग, प्रेसिंग आणि इतर अनेक कारणांमुळे लोकांचे केस तुटणं, केसारख्या सस पातळ होणं यांमस्यांचा सामना करावा लागतो. केसांशी निगडीत समस्या टाळणयासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर्स वापरतात.  अनेकदा यासाठी हजारो रूपयांचा खर्च होतो.  इतकं करूनही मनासारखा परिणाम दिसत नाही. (Homemade Chutney For Hair Fall Control)

तुम्हीसुद्धा केसांच्या समस्येनं त्रस्त असाल तर तेल किंवा शॅम्पू नाहीतर एक स्पेशल चटणी वापरून तुम्ही केसांचं गळणं कमी करू शकता आणि केस गळणंही थांबवू शकता. ज्यामुळे केसांवर चांगली चमक येईल. ही स्पेशल चटणी कशी तयार करावी ते समजून घेऊ.   गट हॉर्मोन हेल्थ कोच आणि डायटिशयन मनप्रीत कालरा यांनी इंस्टाग्रामवर या चटणीची रेसिपी शेअर केली आहे. 

कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

कढीपत्ता - १५ ते २० पानं

नारळ - १ मोठा चमचा

तीळ- १ मोठा चमचा

लसूण - अर्धा चमचा

हिरवी मिरची- अर्धा मोठा चमचा

मीठ - १ छोटा चमचा.

काळी मिरी- १ छोटा चमचा

सगळ्यात आधी एक मोठा तवा गरम करून घ्या. तवा गरम झाला की त्यात कढीपत्ता, तीळ, सुकलेला लसूण घालून भाजून घ्या. लसूण भाजून झाल्यानंतर  त्यात हिरवी मिरची आणि काळी मिरी घालून व्यवस्थित भाजा.  हे सर्व पदार्थ भाजून यात सुका नारळ आणि मीठ घाला.  नंतर हे साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्या. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासठी तुम्ही चटणी खाऊ शकता.  डायटिशियन सांगतात की, तुम्ही या चटणीचे सेवन रेग्युलर केल्यास शरीराचा फायदा होईल.

केसांसाठी ही चटणी का फायदेशीर ठरते

डायटिशियन मनप्रीत सांगतात की  या चटणीत कढीपत्त्याचा समावेश असतो. कढीपत्त्यात प्रोटीन्स व्हिटामीन बी ६ आणि बीटा कॅरोटीन असते. या पोषक तत्वांमुळे केस गळणं, केस तुटणं बंद होतं.ही चटणीकॅल्शियम, जिंक आणि आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. ही पोषक तत्व स्काल्पला पोषण देतात. केस गळणं कमी होतं. 

लसणात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे स्काल्पवरील घाण साफ करण्यास मदत होते आणि केस दाट आणि मजबूत होतात. रोज या चटणीचे सेवन केल्यास कमी वयात केस पांढरे होणं ही टाळता येतं. ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या टाळता येते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी