Lokmat Sakhi >Beauty > तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम 

तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम 

Homemade Cracked Heel Scrub For Soft Feet: तळपायाला भेगा पडल्या असतील तर त्या घालविण्यासाठी तसेच तळपायांवरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी हा घरगुती उपाय करून पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 12:04 PM2024-02-13T12:04:56+5:302024-02-13T12:05:45+5:30

Homemade Cracked Heel Scrub For Soft Feet: तळपायाला भेगा पडल्या असतील तर त्या घालविण्यासाठी तसेच तळपायांवरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी हा घरगुती उपाय करून पाहा....

Homemade cracked heel scrub for soft feet, Home remedies for cracked heels, use of tooth paste for softening cracked heel | तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम 

तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम 

Highlightsचांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा उपाय करावा. 

हिवाळ्यातल्या कोरड्या हवेमुळे अनेक जणींना तळपायाला भेगा पडण्याचा त्रास होतो. बऱ्याचदा तर हिवाळा सरला तरी हा त्रास जात नाही. उलट उन्हाळ्यातल्या कोरड्या, उष्ण वातावरणामुळे तर भेगा पडण्याचा त्रास आणखीनच वाढतो आणि तळपाय खूपच रखरखीत होऊन जातात. या त्रासाकडे दुर्लक्ष केलं तर बऱ्याचदा त्या भेगा रक्ताळतात. शिवाय असे भेगाळलेले रखरखीत तळपाय दिसायलाही खूपच अस्वच्छ वाटतात (use of tooth paste for softening cracked heel). म्हणूनच तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. (Home remedies for cracked heels)

 

तळपायांवरच्या भेगा कमी करण्यासाठी उपाय

तळपायांवरच्या भेगा तसेच डेड स्किन काढून टाकण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येईल, याविषयीची माहिती mysha_beauty_queen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स घालविणारे ५ नॅचरल स्क्रब

साहित्य

१ टेबलस्पून टुथपेस्ट

१ टीस्पून ग्लिसरीन

१ टीस्पून तांदळाचे पीठ

 

कृती

सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये टुथपेस्ट, ग्लिसरीन आणि तांदळाचे पीठ घेऊन ते व्यवस्थित कालवून घ्या.

यानंतर तळपाय थोडेसे ओलसर करा आणि त्यांच्यावर आपण तयार केलेली पेस्ट लावा.

त्याला 'I Love You' म्हणायची हिंमत होत नाही? मग हातावरची मेहेंदी दाखवून हटके स्टाईलने द्या प्रेमाची कबुली

यानंतर एखादा जुना टुथब्रश घेऊन पायांच्या टाचा १० ते १२ मिनिटे घासा. घासताना पाय कोरडे झाले तर पुन्हा पाणी लावून पाय घासा.

यानंतर कोमट पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा आणि नंतर धुवून टाका. एकदा जरी हा उपाय केला तरी तळपायावरच्या भेगा बऱ्याच प्रमाणात कमी होतील. चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा उपाय करावा. 


 

Web Title: Homemade cracked heel scrub for soft feet, Home remedies for cracked heels, use of tooth paste for softening cracked heel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.