Join us  

काकडीचे ४ फेसपॅक उन्हाळ्यात चेहरा ठेवतील चमकदार आणि कायम फ्रेश, पाहा झटपट जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 6:24 PM

Homemade Cucumber Face Packs For A Glowing Skin काकडी उन्हाळ्यात आपण खातोच, चेहऱ्याच्या उन्हाळी समस्यांसाठीही ती उत्तम औषध ठरते

काकडीची कोशिंबीर अनेकांना आवडतेच. काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात काकडी खाण्याचे प्रमाणही वाढते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडी खाल्ली जाते. उन्हाळ्यात काकडीचा वापर करून आपण विविध फेसमास्क बनवू शकता. या फेसमास्कमुळे स्किनच्या निगडीत समस्या कमी होतील, यासह टॅनिंगची समस्याही नाहीशी होईल. चला तर मग काकडीचा वापर फेसमास्कसाठी कसा करता येईल ते पाहूयात(Homemade Cucumber Face Packs For A Glowing Skin).

काकडीचा रस लावा

काकडी किसून घ्या. त्याचा रस काढून चेहरा आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटे ठेवा. चेहरा साध्या पाण्याने धुवा. आपण याचा नियमित वापर करू शकता. यामुळे स्किन हायड्रेटेड होते. व त्वचेच्या समस्या कमी होतात.

उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

काकडी आणि पुदिना पेस्ट

काकडी किसून घ्या. त्याचा रस काढा. त्यात पुदिन्याची पाने मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. काही मिनिटानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

काकडी आणि कोरफडीचा फेसमास्क

काकडी किसून घ्या. त्याचा रस काढा. त्यात एलोवेरा जेल घाला. दोन्ही गोष्टी नीट मिसळा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा.

उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

काकडी आणि मुलतानी माती फेसपॅक

एका भांड्यात काकडी किसून घ्या. त्याचा रस काढा. त्यात मुलतानी माती घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे त्वचेवर लावा. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३वेळा याचा वापर आपण करू शकता. ऑयली स्किनसाठी हा फेसमास्क बेस्ट आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी