Lokmat Sakhi >Beauty > केस गळून विरळ झालेत? खोबरेल तेलात मिसळा कांदा-कडीपत्ता; हेअर ग्रोथचं सिक्रेट

केस गळून विरळ झालेत? खोबरेल तेलात मिसळा कांदा-कडीपत्ता; हेअर ग्रोथचं सिक्रेट

Homemade Curry Leaves, Coconut oil and Onion Hair Oil for Double Hair Growth : केसांच्या वाढीसाठी फक्त खोबरेल तेल लावू नका.. कांदा-कडीपत्त्यातील गुणधर्म केसांसाठी ठरेल वरदान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 04:34 PM2024-01-25T16:34:56+5:302024-01-25T16:35:47+5:30

Homemade Curry Leaves, Coconut oil and Onion Hair Oil for Double Hair Growth : केसांच्या वाढीसाठी फक्त खोबरेल तेल लावू नका.. कांदा-कडीपत्त्यातील गुणधर्म केसांसाठी ठरेल वरदान..

Homemade Curry Leaves, Coconut oil and Onion Hair Oil for Double Hair Growth | केस गळून विरळ झालेत? खोबरेल तेलात मिसळा कांदा-कडीपत्ता; हेअर ग्रोथचं सिक्रेट

केस गळून विरळ झालेत? खोबरेल तेलात मिसळा कांदा-कडीपत्ता; हेअर ग्रोथचं सिक्रेट

केसांच्या समस्या सोडवण्यासाठी यासह वाढीसाठी आपण अनेक नैसर्गिक उत्पादनांचा वापर करतो (Hair care Tips). जसे की खोबरेल तेल, कांद्याचा रस, कडीपत्ता, एरंडेल तेल यासह इतर उपाय उपयुक्त ठरतात. मुख्य म्हणजे खोबरेल तेलामुळे केसांना पुरेसे पोषण मिळते. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. बरेच जण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. जर केसांना पोषण मिळावे असे वाटत असेल तर, त्यात कांदा आणि कडीपत्ता मिक्स करा.

कांद्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात (Homemade Hair Oil). ज्यामुळे केसांच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते. मुख्य म्हणजे अनेक केसांच्या निगडीत समस्या दूर होतात. आपण घरी देखील कांद्याचे तेल तयार करू शकता(Homemade Curry Leaves, Coconut oil and Onion Hair Oil for Double Hair Growth).

कांद्याचे तेल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

खोबरेल तेल

कांदा

प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ

कडीपत्ता

कांद्याचे तेल तयार करण्याची कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात कांद्याच्या फोडी आणि कडीपत्त्याची पानं घेऊन पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करत असताना त्यात पाणी घालू नका. आता एका कढईत तयार कांद्याची पेस्ट घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर त्यात एक कप खोबरेल तेल घाला. तेलाला उकळी आल्यानंतर, गॅस बंद करा. तयार तेल एका बाऊलमध्ये काढून घ्या. रात्रभर तेल झाकून ठेवा. सकाळी चहाच्या गाळणीने गाळून तेल एका हवाबंद डब्यात काढून घ्या, व या तेलाचा वापर आठवड्यातून एकदा करा.

केसांसाठी कांद्याच्या तेलाचे फायदे

खोबरेल तेल

खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्स असतात. नियमित खोबरेल तेलाचा वापर केसांवर केल्याने, स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे स्काल्प स्वच्छ करण्यास मदत करते. यासह केसातील कोंडा काढण्यास उपयुक्त ठरते. कांद्याच्या रसात सल्फर देखील असते. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.

सनी लिओनीला आवडतो देसी ढाबास्टाईल आलू पराठा, झटपट पराठा करण्याची पाहा सोपी रेसिपी

कडीपत्ता

कडीपत्ता फक्त फोडणीसाठी नसून, केसांच्या वाढीसाठीही मदत करते. कडीपत्त्यात व्हिटॅमिन सी आणि बी असते. शिवाय त्यात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाणही जास्त असते. कडीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.

Web Title: Homemade Curry Leaves, Coconut oil and Onion Hair Oil for Double Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.