Join us  

केस खूपच लवकर पिकले? १ चमचा कॉफीने घरीच बनवा डाय; काळे-दाट राहतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 9:42 AM

Homemade Die For Black Hairs : घरगुती उपायांमध्ये केमिकल्स नसल्यानं कोणतेही साईट इफेक्ट्स जाणवत नाहीत आणि फार खर्चही करावा लागत नाही.

केस पिकण्याची समस्या सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उद्भवते. एकदा केस पिकायला सुरूवात झाली की आयुष्यभर केस पिकत राहतात. डाय, ग्लोबल कलरमध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात. (Hair Care Tips)  यामुळे केस थोड्या वेळापूरता काळे झाल्यासारखे दिसतात पण नंतर पुन्हा पांढरे दिसू लागतात. काही घरगुती उपाय केसांसाठी गुणकारी ठरतात. कारण घरगुती उपायांमध्ये केमिकल्स नसल्यानं कोणतेही साईट इफेक्ट्स जाणवत नाहीत आणि फार खर्चही करावा लागत नाही. (How to prevent white hairs)

घरगुती डाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक चमचा आवळा पावडर, १ चमचा १ चमचा धणे पावडर, १ चमचा  मेहेंदी पावडर, १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा कलौंज बीयांची पावडर घ्या. यात २०० mL तिळाचं तेल घाला. मिश्रणात हे तेल मिक्स करून व्यवस्थित  शिजवून घ्या नंतर गॅस बंद करून हे तेल एका बॉटलमध्ये गाळून घ्या. हे तेल केसांच्या मुळांना लावून मसाज करा. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी  शॅम्पून केस स्वच्छ धुवा. या उपायानं केस लवकरात लवकर केस काळे होण्यास मदत होईल.

आवळा व्हिटॅमिन सी च्या गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि केसांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात शतकानुशतके वापरला जात आहे. त्याचप्रमाणे मेथीमध्येही अनेक पोषक घटक असतात. या दोघांच्या मिश्रणामुळे केसांना नैसर्गिक रंग तर येतोच, पण केसांचे पोषणही होते.  बदाम तेल सुद्धा व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे, जो केसांसाठी खूप चांगले मानले जाते. हे केसांच्या मुळांचे पोषण करते आणि केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते.

रोज गळून माथ्यावरचे केस पातळ झाले? आजपासूनच 'हा' पदार्थ खा, केसांची वाढ होईल भराभर

कॉफी पावडरचा स्प्रे केसांवर तुम्ही लावू शकता.  यात पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये घालून ठेवा. आणि स्काल्पवर व्यवस्थित स्प्रे करा. हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर २० मिनिटांनी सौम्य शॅम्पूनं केस धुवा केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे केस  चमकदार आणि सुंदर दिसतील.

दंड गोरे पण कोपर काळेकुट्ट दिसतात? १ सोपा उपाय, काळपटपणा होईल दूर-सुंदर दिसतील हात

नारळाच्या तेलात कॉफी पावडर मिक्स करून केसांवर लावू शकता. नारळाचं तेल आणि कॉफी पावडर केसांना कंडिशनिंग करण्यासाठी आणि स्मूद बनवण्यासाठी मदत करते. यासाठी सगळ्यात आधी नारळाचं तेल घ्या त्यात एक चमचा कॉफी पावडर मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित एकजीव करून केसांना लावा. १५ ते २० मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी