Join us  

आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 1:51 PM

Navratri 2024 Day 2 Green Facemask For Pimples & Acne : Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin : Best face mask for pimples and acne : पिंपल्स, ऍक्नेवर कडुलिंब-तुळशीच्या पानांचा खास रामबाण उपाय...

त्वचेवर सतत येणारे पिंपल्स आणि ऍक्ने नकोसे वाटतात. या पिंपल्स आणि ऍक्नेमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. चेहऱ्यावर एकही पिंपल्स किंवा त्याचा काळा डाग नसावा अशी प्रत्येकीची इच्छा असते. आपली स्किन कायम नितळ, सुंदर दिसावी असेच सगळ्यांना वाटत असते. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि ऍक्ने फार मोठ्या प्रमाणात येतात. चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर एकही पिंपल्स किंवा डाग नसतात. चेहर्‍यावरील पिंपल्स किंवा काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्सच वापरले जातात.(Best face mask for pimples and acne).

त्वचेवरील पिंपल्स व काळे डाग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स किती उपयोगी आहेत, हे प्रत्येकाच्या त्वचेवर अवलंबून असते. परंतु या प्रॉडक्ट्समधील रासायनिक घटकांमुळे एक तर ही समस्या आणखी वाढते किंवा त्वचेच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या कारणांनी आलेले पिंपल्स, फोड व त्यांचे काळे डाग कमी करण्यासाठी हा खास हिरव्या रंगाचा घरगुती फेसमास्क नक्की ट्राय करुन पाहा. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट देखील हा खास हिरव्या रंगाचा कडुलिंब-तुळशीचा फेसमास्क (Navratri 2024 Day 2 Green Facemask For Pimples & Acne) वापरणे पसंत करते. अनेकदा सतत येणाऱ्या पिंपल्समुळे काहीजणींमध्ये पिंपल्स कमी झाल्याचं देखील दिसून येत. असे असले तरीही आपण काही घरगुती उपायांचा वापर करून चेहर्‍यावरील पिंपल्स आणि ऍक्ने काम करु शकतो. पिंपल्स, ऍक्ने कमी करण्यासाठी हा हिरव्या रंगाचा फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहूयात(Homemade Face Packs For Pimples and Acne Prone Skin).

साहित्य :- 

१. कडुलिंबाची पानं - ३ ते ४ पानं २. तुळशीची पानं - ८ ते १० पानं ३. दही - १ टेबलस्पून ४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून ५. गुलाब पाणी - १ टेबलस्पून ६. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ?  

१. एका मिक्सरजारमध्ये, कडुलिंबाची पानं, तुळशीची पानं, दही, एलोवेरा जेल, गुलाब पाणी असे सगळे एकत्रित करून त्याची पातळसर पेस्ट वाटून घ्यावी. २. मिक्सरमध्ये वाटून तयार झालेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. ३. या पातळ पेस्टमध्ये तांदुळाचे पीठ घालून चमच्याने हलवून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.     

अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...

गरबा खेळताना माथापट्टी तिरकी होते-बिंदी पडून जाते? २ सोप्या युक्त्या-फोटोही येतील एकदम परफेक्ट...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला हिरव्या रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.  

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. कडुलिंबाची पानं :- कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे पिंपल्स आणि त्यांचे काळे डाग कमी करण्यास मदत करते. तसेच पिगमेंटेशन आणि ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

२. तुळशीची पानं :- तुळशीच्या पानांचा रस त्वचेमधील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचे मुख्य काम करतात. 

३. दही :- दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' ऍक्नेची समस्या दूर करण्याबरोबरच त्वचेला थंडावा मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरते. 

४. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल आपल्या त्वचेला डिप हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.   

५. गुलाब पाणी :- गुलाब पाणी त्वचेची पीएच पातळी संतुलित करते. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या, रेषा, वांग दिसू लागतात असे अनेक स्किन प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

६. तांदुळाचे पीठ :- तांदुळाच्या पिठाने त्वचेचा रंग उजळतो आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४ब्यूटी टिप्सनवरात्रीत्वचेची काळजीआलिया भट