Join us  

पाडवा-भाऊबीजेला चेहऱ्यावर ग्लो हवा? ब्यूटी स्पेशालिस्ट सांगतात, घरातील गोष्टींपासून करा ३ सोपे स्क्रब; दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 1:53 PM

Homemade Face Scrub For Glowing Skin by Dr. Jayashree Sharad : घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून स्क्रब कसे तयार करता येतील ते पाहूया.

ठळक मुद्देपार्लरला जायला वेळ नाही, तर चेहरा ग्लोईंग दिसावा म्हणून घरच्या घरी असे करा स्क्रबकेमिकल्स असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा सौंदर्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केव्हाही चांगले

सणावाराच्या दिवशी आपण नेहमीपेक्षा खास दिसावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. मात्र घरातली कामं, ऑफीसची टार्गेटस, खरेदी, पाहुण्यांची ये-जा या नादात आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला जमतंच असं नाही. मग आपल्या चेहऱ्यावर किती फोड आलेत आणि आपली स्कीन किती खराब झालीये हे पाहायलाही अनेकदा आपल्याला वेळ होत नाही. पाडवा आणि भाऊबीज उद्यावर आली असताना अनेकींना पार्लरमध्ये जायलाही वेळ मिळाला नसेल. अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून स्क्रब कसे तयार करता येतील ते पाहूया. प्रसिद्ध ब्युटी स्पेशालिस्ट डॉ. जयश्री शरद आपल्याला याविषयी माहिती देतात. त्या इन्स्टाग्रामवर नेहमी आपल्या फॉलोअर्सना ब्युटी विषयातील माहिती शेअर करत असतात. पाहूया आता त्यांनी चेहऱ्यासाठी कोणते ३ स्क्रब सुचवले आहेत (Homemade Face Scrub For Glowing Skin by Dr. Jayashree Sharad)...

१. पपई स्क्रब 

पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी पुरेशा प्रमाणात असते. तसेच या फळामध्ये पापाईन नावाचे एन्झाईम अँटीऑक्सिडंटही असते. त्यामुळे १० मिनीटांसाठी पपईची प्युरी चेहऱ्यावर लावून ठेवावी. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो मिळण्यास मदत होते. मात्र तुमची स्कीन खूप सेन्सिटीव्ह असेल तर मात्र हा उपाय करणे योग्य नाही. 

२. डाळी आणि ओटस

मसूर डाळ आणि ओटस यांची थोडी जाडसर पूड करावी. ही पूड चेहऱ्यावर स्क्रबर म्हणून वापरता येते. ही पूड स्क्रबरसारखी चेहऱ्यावर लावून थोडा वेळाने चेहरा धुतल्यास चेहरा ग्लो करण्यास मदत होते. या गोष्टी साधारणपणे आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या असल्याने त्याचा आपण सौंदर्यासाठी उपयोग करुन घेऊ शकतो. 

(Image : Google)

३. मध आणि कॉफी

मधामध्ये मॉईश्चरायजिंग गुणधर्म असतात. तर कॉफी ही उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. हे दोन्ही पदार्थ एकत्र करुन १० मिनीटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवावे. यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास तर मदत होते. मात्र तुमचा चेहरा खूप जास्त सेन्सिटीव्ह असेल तर मात्र हा उपाय वापरु नये.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी