ओठ सुंदर असतील तर सौंदर्यात भर पडते. ओठ लाल दिसावेत, ओलसर आणि मऊ राहावेत यासाठी ओठांवर लिपबाम लावल जातो. पण बाहेरच्या लिपबाममध्ये रासायनिक घटक असतात. त्याचे ओठांवर दुष्परिणाम होतात. गुलाबी-मऊ-ओलसर ओठांसाठी लिपबाम तर आवश्यक आहेच. पण तो घरच्याघरी तयार करता येतो. डाळिंबं, बीट, पपईपासून घरच्याघरी सोप्या पध्दतीनं लिपबाम तयार करता येतो.
Image: Google
डाळिंबाचा लिपबाम
डाळिंबाचा लिपबाम तयार करण्यासाठी 1 कप डाळिंबाचे दाणे, तूप, गाळणी, चमचा, डबल बाॅयलर या सामग्रीची आवश्यकता असते. लिप बाम तयार करण्यासाठी सर्वात आधी गाळणी आणि चमच्याच्या मदतीनं डाळिंबाचा रस काढून घ्यावा. हा ज्यूस डबल बाॅयलरमध्ये ठेवून 10-15 मिनिटं गरम करावा. नंतर अर्धा चमचा तूप गरम करावं. ते तूप डाळिंबाच्या रसात चे मिश्रण दोन मिनिटं चांगलं हलवून घ्यावं.
Image: Google
हे मिश्रण एका छोट्या भांड्यात काढावं. हे भांडं 15 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवावं. नंतर एका स्टीलच्या भांड्यात ते काढून हे भांडं गॅसवर मंद आचेवर उकळावं. मिश्रण निम्मं आणि घट्टसर होवू द्यावं. मिश्रण दाटसर होवू झालं की त्यात 2 चमचे तूप घालाव्ं. पुन्हा गॅस सुरु करावा. मिश्रण 1 मिनिट मंद आचेवर उकळावं. गॅस बंद करुन हे मिश्रण एका छोट्या भांड्यात काढून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवावं. 20 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवल्यावर लिप बाम तयार होतो.
Image: Google
बीटाचा लिपबाम
ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येण्यासाठी घरच्याघरी तयार केलेल्या लिपबामचा उपयोग होतो. बीटाचा लिपबाम तयार करण्यासाठी बीट, 1 चमचा व्हॅसलीन, 1 चमचा कोरफडचा गर आणि गाळणी या सामग्रीची आवश्यकता असते. बीटाचा लिपबाम तयार करण्यासाठी बीटाची सालं काढून घ्यावीत. बीट बारीक चिरुन घ्यावं. बीटाचे तुकडे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. एका वाटीत बीटाचा रस गाळून घ्यावा.
Image: Google
एका भांड्यात बीटाचा रस घेऊन तो मध्यम आचेवर उकळावा. बीटाचा रस निम्मा होईपर्यंत उकळावा. उकळताना सतत हलवत राहावा. मिश्रण गार झाल्यावा छोट्या भांड्यात काढावं. यात एक चमचा कोरफडचा गर आणि 1 चमचा व्हॅसलीन घालून मिश्रण एकजीव करावं. हे मिश्रण अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवावं. अशा सोप्या पध्दतीनं बीटाचा लिपबाम घरच्याघरी करता येतो.
Image: Google
पपईचा लिपबाम
घरच्याघरी तयार केलेल्या पपईच्या लिपबाममुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येतो तसेच ओठ फाटतही नाही. पपईचा लिपबाम तयार करण्यासाठी तूप, पपई आणि गाळणी घ्यावी. लिपबाम करताना सर्वात आधी पपईचे साल काढून घ्यावं. पपई चिरुन ती कुस्करुन घ्यावी. मिक्सरमधून बारीक केली तरी चालते.
Image: Google
एका वाटीत 1 मोठा चमचा साजूक तूप घालावं. याच वाटीत गाळणीत कुस्करलेली पपई घेऊन चमच्याच्या मदतीनं पपईचा रस काढावा. पपईचा रस आणि तूप चांगलं एकत्र करुन चांगलं फेटून घ्यावं. मिश्रण 1- 2 मिनिट फ्रिजमध्ये ठेवावं. नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून उकळून घ्यावं. मिश्रण उकळून थोडं गार झालं की एका छोट्या भांड्यात काढावं आणि पुन्हा 2 मिनिटासाठी फ्रिजमध्ये ठेवला की पपईचा लिपबाम तयार होतो.