Join us  

त्वचा तेलकट असो किंवा ड्राय, चमचा भर हिरव्या मुग डाळीचा करा खास पॅक, चेहरा चमकेल चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 5:26 PM

Homemade Green Gram Facemask, Skin will Glow आपण पौष्टिक म्हणून खातो ती मुगाची सालाची डाळ त्वचेच्या विविध समस्यांवरही गुणकारी आहे.

प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते. ज्यामुळे स्किनच्या निगडीत समस्या देखील बदलत राहतात. प्रत्येक जण आपापल्या त्वचेच्या प्रकारानुसार विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतात. आपण जर चुकीचे प्रॉडक्ट्स वापरले तर, नक्कीच याचा दुष्परिणाम आपल्या स्किनला सहन करावे लागेल. त्यामुळे कोणते प्रॉडक्ट्स वापरावे कोणते टाळावे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यातील त्वचेची समस्या सोडवायची असल्यास सालाची मुगाची डाळ, छिलकेवाली डाळ किंवा हिरवी मूग डाळ अशी जिची वेगवेगळी नावं आहे. त्या हिरव्या मुग डाळीच्या फेसमास्कचा वापर करा. तेलकट यासह ड्राय त्वचेसाठी हा उपाय फायदेशीर ठरेल. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि तांबे यांसारखी खनिजे असतात. याव्यतिरिक्त, त्यात फोलेट, फायबर आणि व्हिटॅमिन बी ६ देखील असतात. तसेच हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्वचेला चमकदार बनवायचं असेल तर, हा उपाय नक्की करून पाहा.

तेलकट त्वचेसाठी

आपली त्वचा खूप तेलकट असेल तर, हिरव्या मुग डाळीचा फेसमास्कचा वापर करा. दोन चमचे  डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी वाटा, त्यात गुलाब जल मिक्स करून पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

माथ्यावरचे केस विरळ झालेत, टक्कल पडेल असे वाटते? ४ उपाय, माथ्यावरचे केस होतील दाट

कोरड्या त्वचेसाठी

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मुग डाळीचा फेसमास्क बनवा.डाळ रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मिक्सरच्या भांड्यात भिजेलेले मुग डाळ व मध घालून पेस्ट तयार करा. २० मिनिटांसाठी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

मूग डाळीचे इतर फायदे

१.  त्वचेचे संरक्षण करते

उन्हाळ्यातील त्वचेचे नुकसान रोखण्यासाठी हिरवे मुग डाळ मदत करेल. उन्हात गेल्यानंतर त्वचा टॅन होत असेल तर, हा उपाय करून पाहा. या फेसपॅकमुळे त्वेच्या निगडीत समस्या कमी होतील.

हेअर स्ट्रेटनिंगसाठी करायचं आहे, १० रुपये दह्यावर खर्च करा, सरळ-सिल्की केसांसाठी हा घ्या दह्याचा उपाय

२. त्वचेवर चमक आणते

त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी मूग डाळ फेसपॅकचा वापर करा.

३. लालसरपणा कमी करते

जास्त घाम येणे किंवा उष्णतेमुळे त्वचा लाल होते. किंवा खाज येण्याची समस्या वाढते. ही समस्या कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी हा फेसमास्क लावा. याने चेहरा मुलायम राहेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी