Lokmat Sakhi >Beauty > तुळस - गुलाब पाणी आणि ग्लिसरीन, उन्हाळयात त्वचेच्या सर्व समस्यांवर सोपा आणि मस्त उपाय, करुन तर पाहा

तुळस - गुलाब पाणी आणि ग्लिसरीन, उन्हाळयात त्वचेच्या सर्व समस्यांवर सोपा आणि मस्त उपाय, करुन तर पाहा

Homemade gulab jal and Tulsi Toner प्रॉब्लेम फ्री स्किन हवीय? वापरा तुळशी स्किन टोनर, घ्या त्वचेची काळजी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 12:05 PM2023-04-18T12:05:43+5:302023-04-18T12:06:41+5:30

Homemade gulab jal and Tulsi Toner प्रॉब्लेम फ्री स्किन हवीय? वापरा तुळशी स्किन टोनर, घ्या त्वचेची काळजी..

Homemade gulab jal and Tulsi Toner | तुळस - गुलाब पाणी आणि ग्लिसरीन, उन्हाळयात त्वचेच्या सर्व समस्यांवर सोपा आणि मस्त उपाय, करुन तर पाहा

तुळस - गुलाब पाणी आणि ग्लिसरीन, उन्हाळयात त्वचेच्या सर्व समस्यांवर सोपा आणि मस्त उपाय, करुन तर पाहा

आपल्या देशात तुळशीला फक्त वनस्पती म्हणून पाहिलं जात नाही. तर तिच्यासोबत धार्मिक भावना देखील जोडल्या जातात. प्रत्येक घरात बाल्कनीत किंवा दारासमोर तुळशीचे झाड असतेच. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे केवळ शरीरासाठी नाही तर, त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.

त्यात मुख्य म्हणजे बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेच्या समस्या जसे मुरूम, स्किन टॅनिंग, रेड रॅशेस अशा अनेक समस्यांपासून आराम देते. आपण तुळशीचा वापर फेस पॅक, फेस स्टीम, क्लिन्जर, इत्यादी स्वरूपातही करू शकता. आपण तुळशी टोनर देखील बनवू शकता. या टोनरमुळे पुरळ, स्किन एजिंग, पिग्‍मेंटेशन, स्किन कंडीशनिंग यासमस्येपासून सुटका मिळेल. आपण याचा वापर नियमित करू शकता(Homemade gulab jal and Tulsi Toner).

तुळशी टोनर बनवण्यासाठी लागणारं साहित्य 

तुळशीचे पानं 

गुलाब जल 

ग्लिसरीन 

या पद्धतीने बनवा तुळशी टोनर

सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करत ठेवा. त्यात पाणी घालून एक उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तुळशीचे पाने धुवून घाला. आता त्यावर झाकण ठेऊन उकळी येऊ द्या. १० मिनिटानंतर  गॅस बंद करा. व त्याचे पाणी चहाच्या गाळणीने गाळून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून घ्या, व त्यात गुलाब जल, १ चमचा ग्लिसरीन मिसळून टोनर तयार करा. अशा प्रकारे स्किन टोनर वापरण्यासाठी रेडी.

कलिंगड खा आणि उरलेल्या कलिंगडाचे करा ३ फेसपॅक, चेहरा चमकेल आणि उजळेल

अशा पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोनर

आपण हा टोनर कुठेही कॅरी करू शकता. हा टोनर वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर एका कापडाने पुसून घ्या. व हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. स्प्रे केल्यानंतर चेहरा कॉटन बॉलच्या मदतीने पुसटपणे पसरवा. टोनर सुकल्यानंतर त्यावर लोशन लावा.

तुळशी टोनरचे इतर फायदे

- जर त्वचा सैल झाली असेल, चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागल्या असतील तर, तुळशीचा टोनर रोज वापरावा. यामुळे त्वचेचे छिद्र घट्ट होतील आणि त्वचा तरुण दिसेल.

नाभीत साचलेला मळ स्वच्छ करण्याचे ५ उपाय, पर्सनल हायजिनकडे दुर्लक्ष पडतं महागात

- त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण दररोज तुळशीचा टोनर वापरू शकता. यामुळे उन्हात चेहऱ्यावर ओलावा राहील आणि त्वचा हायड्रेटेड दिसेल. 

Web Title: Homemade gulab jal and Tulsi Toner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.