Join us  

केमिकल डाय कशाला? २ बदाम-कांद्याची साल; ५ मिनिटात तयार करा नॅचरल हेअर डाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2024 3:00 PM

Homemade Hair Dye for Grey Hair : केसांना रसायनयुक्त मेहेंदी आणि केमिकल डाय लावण्यापेक्षा घरगुती डाय लावा..

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीराचं गणित बिघडत चाललं आहे. शिवाय केसांच्या (Hair Care) निगडीत समस्या वाढत चालल्या आहेत. आजकालच्या रसायनयुक्त उत्पादनांमुळे कमी वयात लोकांचे केस पांढरे होताहेत. वयाच्या आधी म्हातारे दिसावं असं कोणालाच वाटत नाही. केस पांढरे झाले की, त्यावर आपण अनेक उपाय करून पाहतो. काही लोकं महागडे प्रॉडक्ट्स, मेहेंदी, किंवा केमिकल डायचा वापर करतात.

बऱ्याचदा मेहेंदीमुळे पांढऱ्या केसांवर लाल किंवा सोनेरी रंग चढतो. इन्स्टंट रिझल्टसाठी बहुतांश लोकं हेअर डायचा वापर करतात (Natural hair dye). पण हेअर डायमुळे केसांवर रंग तर चढतोच. पण रसायनयुक्त केमिकल्समुळे केस खराब होण्याची समस्या वाढते. त्यामुळे केमिकल डायचा वापर न करता आपण घरात देखील कांद्याची साल आणि बदामाचा वापर करून हेअर डाय तयार करू शकता(Homemade Hair Dye for Grey Hair).

नॅचरल हेअर डाय तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

बदाम

कांद्याच्या साली

मेथी दाणे

आलं

नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

खोबरेल तेल

ई कॅप्सुल

अशा पद्धतीने तयार करा नॅचरल हेअर डाय

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आलं, ३ टेबलस्पून मेथी दाणे, एक छोटा कप कांद्याची साल, ४ बदाम घालून वाटून घ्या. नंतर गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात वाटलेली भरड घालून भाजून घ्या. जोपर्यंत तयार पावडरचा रंग काळा होत नाही तोपर्यंत भाजून घ्या.

भाजून घेतल्यानंतर तयार पावडर एका काचेच्या डब्यात काढून घ्या. नंतर त्यात ४ ते ५ चमचे खोबरेल तेल आणि २ ई कॅप्सुल घालून मिक्स करा. अशा प्रकारे नॅचरल हेअर डाय कलर रेडी.

अशा पद्धतीने केसांवर लावा नॅचरल हेअर डाय

सर्वप्रथम, केस विंचरून घ्या. तयार डाय केसांच्या मुळांपासून लावायला सुरुवात करा. नंतर संपूर्ण केसांवर लावा. केसांवर डाय अर्धा तासासाठी ठेवा. अर्धा तासानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. अशारित्या केसांवर नॅचरल हेअर कलर चढेल. शिवाय केसांना याचा फायदाच होईल.

पायांच्या नखांमध्ये जमा झाली बुरशी? नखं पिवळी-काळपट पडली? २ घरगुती उपाय; नखं होतील स्वच्छ

नॅचरल हेअर डाय लावण्याचे फायदे

- केसांवर बदाम तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ असतात. ज्यामुळे स्काल्प क्लिन होते. शिवाय ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत होते.

-  कांद्याच्या रसामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात, जे तुमच्या केसांना खोलवर पोषण देते. शिवाय त्यातील सल्फर घटकामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

- मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, विटामिन सी असते. ज्यामुळे स्काल्प क्लिन राहते. शिवाय केसांच्या वाढीस मदत करते.

- खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्स आढळतात. हे केसांची निगा राखण्यास मदत करतात. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.

- व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केसांसाठी अनेक प्रकारे करता येतो. केसांचा रंग सुधारण्यासोबतच ते मुळांपासून मजबूतही होतात. शिवाय केस गळणेही थांबते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स