Lokmat Sakhi >Beauty > रोज रोज गळून केस शेपटीसारखे झाले? हे खास घरगुती तेल लावा-१०० % वाढतील केस-दाट होतील

रोज रोज गळून केस शेपटीसारखे झाले? हे खास घरगुती तेल लावा-१०० % वाढतील केस-दाट होतील

Homemade Hair Growth Oil For Women (kes vadhvnyasathi konte tel use karave) : केस गळणं रोखण्यासाठी तुम्ही विकतचे महागडे तेल, शॅम्पू घेण्यापेक्षा घरच्याघरी तयार केलेल्या तेलाचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:44 PM2023-12-05T15:44:24+5:302023-12-05T18:15:55+5:30

Homemade Hair Growth Oil For Women (kes vadhvnyasathi konte tel use karave) : केस गळणं रोखण्यासाठी तुम्ही विकतचे महागडे तेल, शॅम्पू घेण्यापेक्षा घरच्याघरी तयार केलेल्या तेलाचा वापर करू शकता.

Homemade Hair Growth Oil For Women : Which Homemade Oil is Best for Hair Growth and Thickness | रोज रोज गळून केस शेपटीसारखे झाले? हे खास घरगुती तेल लावा-१०० % वाढतील केस-दाट होतील

रोज रोज गळून केस शेपटीसारखे झाले? हे खास घरगुती तेल लावा-१०० % वाढतील केस-दाट होतील

केस जसजसे वाढू लागतात (Hair Growth tips) तसे गळणं सुरू होतं, त्यामुळे बऱ्याचजणी केस लहान ठेवतात किंवा आहेत ते केस व्यवस्थित ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. (kes vadhvnyasathi gharguti upay) केसांची कितीही काळजी घेतली तरी  आजारपण, सतत विचार करण्याची सवय-टेंशन घेणं, वेळेवर  न खाणं, जेवणात प्रोटीन नसणं यामुळे केस जास्त गळू लागतात. केस गळणं रोखण्यासाठी तुम्ही विकतचे महागडे तेल, शॅम्पू घेण्यापेक्षा घरच्याघरी तयार केलेल्या तेलाचा वापर करू शकता. ज्यामुळे केस दाट आणि सुंदर होतील. विशेष  म्हणजे याचे कोणतेही साईट इफेक्ट्सही जाणवत नाहीत. (Best for Hair Growth and Thickness)

घरगुती तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एलोवेराची पानं कापून घ्या. छोट्या लाल कांद्याचे काप, कढीपत्त्याची पानं घालून पेस्ट तयार करून घ्या. एका कढईत नारळाचे तेल गरम करून त्यात ही पेस्ट घाला. नंतर काळी मिरी, मेथी घाला. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल गाळून एक काचेच्या बरणीत भरा. केसांच्या उत्तम वाढीसाठी आठवड्यातून ३ वेळा हे तेल केसांना लावा, कमीत कमी ३ महिने हा उपाय करा. यामुळे केस गळणं बंद होईल आणि केस वेगाने वाढतील आणि नवे केस उगवतील.

समोरचे केस जास्तच पांढरे झालेत? कांद्याची साल 'या' पद्धतीनं लावा, काळेभोर-दाट होतील केस

एलोवेरा आणि कांद्याने केसांना कोणते फायदे मिळतात?

एलोवेरा आणि कांद्याचा मास्क केसांवर लावणं फायदेशीर मानलं जातं. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कांद्याचा रस घ्या, त्यात एलोवेरा जेल मिसळा हे मिश्रण व्यवस्थित फेटून केसांना लावा. काही वेळ तसंच ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

यामुळे तुमचे केस सॉफ्ट राहतील. केस शायनी आणि मजबूत राहण्यासाठी एका बाऊलमध्ये एक ते दोन चमचे दही घाला. यात तुम्ही मध आणि एलोवेरा जेल मिसळू शकता.  हे मिश्रण स्काल्पला लावून मसाज करा. काही वेळानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. 

पोट कमी करायचंय-जीमला जाणंच होत नाही? घरीच फक्त ७ मिनिटं हा व्यायाम करा-स्लिम राहाल

नॅचुरल हेअर मास्क कंडिशनरच्या स्वरूपात काम करतो. हे मिश्रण बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा एलोवेरा जेल आणि त्यात २ चमचा नारळाचे तेलल आणि एक चमचा मध घाला. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने केस धुवून टाका. या उपायांनी केसांची वाढ चांगली होईल.
 

Web Title: Homemade Hair Growth Oil For Women : Which Homemade Oil is Best for Hair Growth and Thickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.