केस गळण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे. वातावरणातील बदल, खाण्यापिण्यातील अनियमितता, हिटींग टुल्सचा वापर यामुळे केस गळायला सुरूवात होते. केस कोरडे पडतात आणि गळायला लागतात. (Hair Care Tips) केसांना पुरेपूर पोषण मिळण्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. (How to Stop hair fall with this DIY coconut and alovera serum)
केस गळणं थांबवण्यासाठी लोक बरेच उपाय करतात पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करूनही अनेकदा हवातसा बदल दिसत नाही. काही घरगुती उपाय केसाचं गळणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Hair Care Tips) नारळाचं तेल, एलोवेरा जेल वापरून तुम्ही केसांसाठी घरच्याघरी सिरम बनवू शकता.
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यात एक चमचा फ्लेक्ससिड्स घाला. फ्लेक्ससिड्स घातल्यानंतर हे पाणी घट्ट होईपर्यंत शिजवा. एका वाटीत एलोवेरा जेल, नारळाचं तेल घालून ही पेस्ट मिक्स करता. (Homemade Serum For Hair Growth)
उन्हाचा त्रास, जीव पाणी पाणी होतो? उन्हाळी लागते? आहार बदला, बघा नक्की काय खाणं फायद्याचं..
त्यात उकळवलेलं फ्लेक्ससिड्ससचं पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. केसांना हे मिश्रण लावल्यानंतर १ तास तसंच राहू द्या. नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.