केस गळणं तसं पाहायला गेलं तर खूप कॉमन आहे. पण जर तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील म्हणजेच रोज १०० - २०० पेक्षा जास्त केस गळत असतील तर हा चिंचेचा विषय असू शकतो. एकदा केस गळायला लागले की १ ते २ आठवडे हेअर फॉल जास्त होतो. (Homemade Hair Mask for Hair Fall Control : Hair Mask for Fast Hair Growth)
अशात केस कमी आणि स्काल्प जास्त दिसून येतो. केस गळतीमुळे वेणी बारीक दिसते आणि घरभर केस पसरतात. केसगळणं थांबवण्यासाठी पार्लर ट्रिटमेंट घेतल्यास त्याचा तात्पुरता परिणाम दिसून येतो. नंतर पुन्हा केस गळू लागतात. घरच्याघरी हेअर पॅक बनवून ते केसांना लावल्यास केसगळतीचा समस्या टळेल.(Homemade Hair Mask for Hair Fall Control)
केळ्याचा हेअर मास्क
केसांवर केळ्याचा हेअर मास्क बनवूनही तुम्ही लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही २ केळी घ्या, त्यात १ चमचा मध आणि १ चमचा नारळाचं तेल घाला. या तिन्ही वस्तू एकत्र मिसळा. तयार हेअर मास्क केसांवर २० मिनिटं लावून ठेवा नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केस मजबूत होतात. याशिवाय केस चमकदार आणि मऊ होतात.
केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस
कडुलिंबाचा हेअर मास्क
एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण कडुलिंब केसांना मजबूती देण्यासह कोंडा दूर करण्यासाठी परिणामकारक ठरतो. याचा केसांवर वापर करण्यासाठी १० ते १२ कडुलिंबाची पानं घेऊन ती वाटून घ्या त्यात ४ चमचे नारळाचं तेल मिसळा. याची पेस्ट केसांना लावून अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा.
दह्याचा हेअर मास्क
हेअर फॉल थांबवण्यासाठी आणि केस गळणं कमी करण्यासाठी दह्याचा मास्क लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्याासाठी दह्यात एक चमचा मध आणि एक चमचा तेल मिसळून पेस्ट बनवा. २० ते २५ मिनिटांसाठी दह्याचा मास्क केसांवर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस गळणं कमी होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावर तेज नाही, डल-उदास-निस्तेज दिसतोय चेहरा? ४ सोपे उपाय, आठवड्यातभरात येईल चेहऱ्यावर चमक
हेअर मसाज
आठवड्यातून एकदा न चुकता केसांची मसाज करा. यामुळे स्काल्पवर ब्लड सर्क्युलेशन चांगंल होतं आणि केस चांगले वाढतात. हेड मसाजमुळे केसांची मूळं मजबूत होतात आणि नवीन केस येण्यास मदत होते.