वाढत्या वयानुसार केस देखील पातळ होतात. तर काही वेळेस अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पातळ होतात (Hair Growth). केस पातळ आणि निर्जीव होण्यामागे अनेक कारणं आहेत (Hair Mask). पोषक तत्वांची कमतरता, विशेषत: प्रथिने, लोह, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12, केसांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात (Haircare). मानसिक ताण, पुरेशी झोप न मिळणे आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे केस गळतात. जर आपले देखील निर्जीव, पातळ आणि वारंवार गळत असतील तर, ब्युटी एक्सपर्ट पूनम चुग यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा.
ब्युटी एक्सपर्ट सांगतात, 'जीवनशैली आणि खाण्याच्या काही चुकांमुळे केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात. शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस आणि त्वचा खराब होते. शिवाय केमिकलयुक्त उत्पादन आणि हीटिंग ट्रिटमेंट्समुळे केसांना अधिक हानी पोहचते. त्यामुळे घरगुती उपायांनी केसांची काळजी घेणं गरजेचं'(Homemade hair mask for hair growth and thickness).
बटाटा आणि कोथिंबीर हेअर मास्क
बटाटा आणि कोथिंबीरीच्या हेअर मास्क आपल्याला केसांना नवीन जीवन देईल. यासाठी मिक्सरच्या भांड्यात कच्चा बटाटा घ्या, त्यात कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा. तयार मिश्रण केसांना लावा. ३० ते ४५ मिनिटांनी केस धुवा. या हेअर मास्कमुळे केस जाड आणि चमकदार होतील.
पिंपल्स - मुरुमांचे डाग जात जाता नाही? पाण्यात ‘या’ छोट्याश्या बिया घालून प्या- स्किन करेल ग्लो
दही आणि द्राक्षांचा हेअर मास्क
दही आणि द्राक्ष देखील केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी एका वाटीत दही घ्या. त्यात द्राक्षांचा रस मिसळा. तयार पेस्ट स्काल्प आणि केसांना लावा. २० ते ३० मिनिटानंतर थंड पाण्याने केस धुवा. या हेअर मास्कमुळे केस जाड आणि चमकदार दिसतील.
मेथी दाणे नारळ पाण्याचा हेअर मास्क
मेथी दाणे केसांसाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतात. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात २ चमचे मेथी दाणे घालून भिजत ठेवा. रात्रभर मेथी भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून, त्यात नारळ पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून, स्काल्प आणि केसांना लावा. ३० - ४५ मिनिटांनी केस शाम्पूने धुवा. यामुळे केस जाड आणि चमकदार दिसतील.
घरात दही - बेकिंग सोडा नाही? कपभर बेसनाचा करा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा; १५ मिनिटात ढोकळा रेडी
केसांसाठी काही एक्स्ट्रा टिप्स
- आहारात प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टींचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, फळे, नट आणि कडधान्ये केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
- केस कायम स्वच्छ ठेवा, आपल्या सोयीनुसार केस धुवा. जास्त गरम पाण्याने केस धुणे टाळा. यामुळे केस कोरडे होऊ शकतात.
- आठवड्यातून एकदा खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने केसांना मसाज करा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांना पोषण मिळते.
- सूर्य, धूळ आणि प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करा. बाहेर जाताना स्कार्फ वापरा.