सध्याच्या स्थितीत केस गळण्याची समस्या खूपच कॉमन झाली आहे. केस गळणं थांबवण्यासाठी बरेच शॅम्पू, हेअर मास्क, पार्लर ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. पण हजारो रुपये खर्च करूनही केसांची वाढ होत नाही. प्रदुषण, चुकीचा आहार, लाईफस्टाईलमधील बदल अशा अनेक गोष्टींचा केसांवर परिणाम होतो आणि केस खूपच गळतात. (Homemade Hair mask for hair growth)
केस गळणं थांबवण्यासाठी घरगुती हेअर मास्क फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला अजिबात खर्च करावा लागणार नाही.(Easy Hair Mask Recipes That Can Boost Your Hair Growth) सगळ्यात आधी एका रिकाम्या भांड्यात पाव वाटी तांदूळ, पाव वाटी मेथी घाला. त्यात पाणी घालून हे मिश्रण शिजवून घ्या. शिजल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर एका कापडात घालून गाळून घ्या. (What is the best homemade hair growth)
गाळल्यानंतर यात एक चमचा एलोवेरा जेल, एक चमचा कॅस्टर ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईल घाला, एक व्हिटामीन ई टॅब्लेट घालून एकत्र करा. तयार हेअर मास्क केसांना लावा. अर्धा ते पाऊण तास हा मास्क केसांना ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. या घरगुती मास्कमुळे केसांना पोषण मिळतं. कोणत्याही केमिकल्सशी केसांचा संपर्क येत नाही. केसांची वाढ भरभर होण्यास मदत होते.