सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे आपण रोजच्या रुटीनमधील काही गोष्टी करणे टाळतो. आहार, चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांची अयोग्य काळजी यामुळेही केसांची वाढ थांबते, शिवाय केसांसबंधी (Homemade Hair Masks Will Give You Longer, Thicker Hair Instantly) अनेक समस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत आपण रोजच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करून केसांची योग्य ती काळजी घेऊ शकता. काही कारणास्तव जर आपल्या केसांची वाढ खुंटली (Homemade Hair Masks For Hair Growth & Thickness) असेल तर केसांची काळजी घेण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. ज्यामुळे आपल्या केसांना आतून पोषण मिळतेच शिवाय केसांची वाढ देखील झपाट्याने होईल(Homemade hair masks for hair growth).
केसांची काळजी घेण्यासाठी आपण कित्येक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो. केसांना घनदाट, चमकदार व कोमल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काही कालावधीसाठी आपण हे करू शकतो. पण, त्यानंतर केसांचं नुकसान होते. काहीवेळा (Best Hair Growth Homemade Mask) तर आपण बाजारांत विकत मिळणारे महागडे प्रॉडक्ट्स देखील मागवतो. या बहुतेक प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. हे केसांसाठी खूप हानिकारक असतात. याचा केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. यासाठी आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी घरच्याघरीच केसांच्या वाढीसाठी नॅचरल हेअर ग्रोथ मास्क तयार करु शकतो. या हेअर ग्रोथ मास्कमुळे आपल्या केसांच्या वाढीस खूप मदत मिळते.
साहित्य :-
१. आवळा पावडर - १/२ कप
२. रिठा पावडर - १/२ कप
३. शिकेकाई पावडर - १/२ कप
४. जास्वंदीची पावडर - १/२ कप
५. भृंगराज पावडर - १/२ कप
६. मेहेंदी - १/२ कप
७. रोझमेरीची पानं - १ टेबलस्पून
८. दही - २ टेबलस्पून
९. पाणी - गरजेनुसार
१०. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...
थंडीत स्किन कोरडी - डल दिसतेय ? स्किन प्रोबेल्म्स होतील दूर, वापरा विंटर स्पेशल 'हा ' फेसपॅक...
कृती :-
१. सगळ्यात आधी एक मोठी काचेची बरणी घेऊन त्यात आवळा पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर, जास्वंदीची पावडर, भृंगराज पावडर, मेहेंदी घालावी.
२. आता सगळ्यात शेवटी यात रोझमेरीची पानं घालावीत.
३. बरणीत या सगळ्या पावडर ओतून घेतल्यानंतर बरणी ३ ते ४ वेळा हलवून आतील सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
हळदी समारंभासाठी हळद भिजवण्याची नवी ट्रिक, त्वचेची आग, जळजळ न होता - दिसेल उजळ...
या हेअर ग्रोथ पावडरचा वापर कसा करावा ?
ही हेअर ग्रोथ पावडर बरणीत भरुन स्टोअर करून ठेवावी. केसांसाठी या पावडरचा वापर करताना आपल्या केसांच्या लांबीनुसार जितकी पावडर लागेल तितकी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर आपण या पावडरमध्ये, आपल्या आवडीनुसार एलोवेरा जेल,दही, व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स किंवा पाणी घालून त्याची पेस्ट तयार करू शकता. ही तयार पेस्ट केसांच्या स्काल्प आणि केसांच्या लांबीनुसार संपूर्ण केसांवर लावून घ्यावी. त्यानंतर २० मिनिटे हा हेअर ग्रोथ मास्क केसांवर असाच लावून ठेवावा. त्यानंतर कोणत्याही हर्बल शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावे. अशाप्रकारे आठवड्यातून किमान २ वेळा आपण हा हेअर मास्क केसांवर लावू शकता. यामुळे महिन्याभरातच केसांच्या वाढीचा वेग वाढेल आणि केस लांबसडक, घनदाट काळेभोर होतील.