Join us  

केस गळतात-वेणी शेपटीसारखी दिसते? 'हे' घरगुती तेल वापरा, लांबसडक-दाट  होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 8:06 PM

Homemade Hair Oil For Hair care : कांद्याच्या रसात भरपूर प्रमाणात सल्फर असते. केसांना चमकदार आणि दाट बनवण्यास मदत होते

आपले केस लांब, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी आपण वेगवगेळ्या प्रकारच्या हेअर ट्रिटमेंट्स घेतो. ब्युटी ट्रेंड्समध्ये आजही नैसर्गिक उपाय सर्वात जास्त वापरले जातात. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी आणि केस लांब होण्यासाठी काही टिप्स वापरायला हव्यात.  काही ट्रिटमेंट्स केसांवर केल्यास केसांची समस्या टाळण्यास मदत होईल. कढीपत्ता, मोहोरीचे तेल, कांद्याचा रस हे साहित्य लागेल. (How To Make Homemade Hair Oil For Hair Growth)

कढीपत्ता नवीन केस उगवण्यास मदत करतो. केसांना शाईन येण्याबरोबरच  केसांना दाट बनवण्यासही मदत होते.  याव्यतिरिक्त  केसांना प्रोटेक्शन लेअर येण्यासही उपयोग होतो. केसांना दाट बनवण्यासाठी पोषण देण्यासाठी मोहोरीचे तेल फायदेशीर ठरते. यातील महत्त्वाची पोषक तत्व केसांना हेल्दी ठेवण्याचे काम करतात. 

कांद्याच्या रसात  भरपूर प्रमाणात सल्फर असते. केसांना चमकदार आणि दाट बनवण्यास मदत होते. यातील सल्फर असल्यामुळे  केस पातळ होत नाहीत. कांद्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ही तत्व केसांना मॉईश्चर देतात. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये केसांच्या लांबीनुसार मोहोरीचं तेल घ्या.

तेलाबरोबर तुम्ही  यात थोडा कढीपत्ता घालू शकता.  तेल गरम करायला ठेवा. १ कांदा वाटून एका वाटीत ठेवा. तेल कोमट गरम झाल्यानंतर यात कांद्याचा रस मिसळा. या तिन्ही पदार्थांना मिक्स केल्यानंतर स्काल्पच्या लेंथपर्यंत लावा. १ ते २ तास केसांना असंच लावून सोडून द्या. नंतर शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. हा उपाय केल्यास काही दिवसांतच केस लांब होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी