Join us  

फक्त १० रूपयात घरीच हे तेल बनवून लावा; कंबरेपर्यंत वाढतील केस; कोंडा-खाजही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:58 AM

Homemade Hair oil For Hair Growth : केस गळू नयेत म्हणून वेळीच काळजी  घेतली तर वाढत्या वयात केस गळण्याचा त्रास थांबवू शकतो. (Hair Care Tips)

केस गळण्यामुळे तरूण तरूणींमध्ये आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसून येतं. हेअर एक्स्टेंशन,  हेअर ट्रांसप्लांट अशा विविध ट्रिटमेंट्स उपलब्ध असल्या तरी हे उपाय खूप खर्चिक असतात. (How to stop hair fall) त्यामुळे गळलेले केस परत मिळवणं सर्वांसाठी शक्य नसतं. केस गळू नयेत म्हणून वेळीच काळजी  घेतली तर वाढत्या वयात केस गळण्याचा त्रास थांबवू शकतो. (Hair Care Tips)

केस गळणं रोखण्यासाठी घरगुती तेल कसं बनवायचं?

सगळ्यात आधी कलौंजीच्या बिया बारीक वाटून घ्या.  मग नारळाचं तेल गरम करण्यासाठी ठेवा. या तेलात कलौंजीच्या बिया बारीक करून घाला आणि त्यात लवंग घा ला. हे तेल उकळल्यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्या. मग तेल गाळून घ्या. हे तेल केसांना लावून मसाज करा आणि २ ते ३ तासांनी केस स्वच्छ धुवा. (Homemade Hair oil For Hair Growth)

यामुळे केस मजबूत होतील आणि केसांची चांगली वाढ होईल. केसांना हे तेल लावण्याआधी स्काल्प स्वच्छ असेल असं पाहा. माती, धुळ लागलेल्या स्काल्पवर हे तेल लावू नका म्हणजेच केस मळलेले असतील तर हे तेल लावू नका. तुम्ही रात्री या तेलानं केसांची मसाज करून सकाळी केस स्वच्छ धुवू शकता.

सुरकुत्यांमुळे चेहरा वयस्कर दिसतोय? ५ टिप्स, बारीक लाईन्स-सुरकुत्या अजिबात येणार नाहीत

केसांसाठी कलोंजी तेल वापरण्याचा आणखी एक फायदा असा आहे की त्याचा नियमित वापर केल्याने केवळ अकाली पांढरे होणे टाळता येते. हे लिनोलिक ऍसिडच्या उच्च प्रमाणामुळे घडते, जे तुमच्या फॉलिकल्समधील काळ्या-रंगद्रव्य पेशी कमी होण्यास प्रतिबंध करते. कलौंजी तेलाचा हा गुणधर्म तुमच्या केसांना जास्त काळ काळे आणि चमकदार ठेवण्यास मदत करतो.

कमी वयात केस पिकलेत? मग डायची झंझट कशाला, २ घरगुती उपाय, केस करा कायमचे काळे

या तेलाचा मोठा फायदा म्हणजे ते तुमच्या टाळूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. कारण कलौंजी बीयांचे तेल हे दाहक-विरोधी, अँटीफंगल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल आणि वेदनशामक गुणधर्मांचा समृद्ध स्रोत आहे. हे सर्व तुमची टाळू स्वच्छ आणि समस्यामुक्त ठेवण्यासाठी खरोखर महत्वाचे आहे. म्हणून, कलोंजी तेलाने आपल्या टाळूची मालिश करणे हा डोक्यातील कोंडा, खाज कमी करण्यासाठी आणि वाढीस चालना देण्यासाठी केसांच्या मुळांना उत्तेजित करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

टॅग्स :त्वचेची काळजीकेसांची काळजी